England vs Namibia, Super 8: नामिबियाला धूळ चारत इंग्लंडचं दमदार कमबॅक! सुपर ८ मध्ये जाण्यासाठी असं आहे समीकरण

England Super 8 Scenario: इंग्लंड संघाला अजूनही सुपर ८ मध्ये जाण्याची संधी असणार आहे. दरम्यान कसं आहे समीकरण? जाणून घ्या.
England vs Namibia, Super 8: नामिबियाला धूळ चारत इंग्लंडचं दमदार कमबॅक! सुपर ८ मध्ये जाण्यासाठी असं आहे समीकरण
englandgoogle
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडवर इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. स्पर्धेतील ३४ व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला धूळ चारत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात इंग्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार नामिबियावर ४१ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ५ गुणांसह इंग्लंडने स्कॉटलंडला मागे सोडलं आहे.

या सामन्यात नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आणि हा सामना १०-१० षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला १० षटकअखेर ५ गडी बाद १२२ धावा करता आल्या. यासह नामिबियाला डकवर्थ लुईस नियमानुसार १२६ धावा करायच्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना नामिबियाला ३ गडी बाद ८४ धावा करता आल्या. यासह इंग्लंडने हा सामना ४१ धावांनी आपल्या नावावर केला.

England vs Namibia, Super 8: नामिबियाला धूळ चारत इंग्लंडचं दमदार कमबॅक! सुपर ८ मध्ये जाण्यासाठी असं आहे समीकरण
IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली

इंग्लंडसाठी कसं असेल समीकरण?

आयसीसी टी-० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी इंग्लंडचा क गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये ६ गुणांची कमाई केली आहे. यासह ऑस्ट्रेलियाने सुपर ८ फेरीत प्रवेश केला आहे. तर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये ५ गुणांची कमाई केली आहे.

England vs Namibia, Super 8: नामिबियाला धूळ चारत इंग्लंडचं दमदार कमबॅक! सुपर ८ मध्ये जाण्यासाठी असं आहे समीकरण
Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर

तर दुसरीकडे ओमान आणि नामिबियाचा संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये सुपर ८ मध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे. इंग्लंडचा संघ पूर्ण जोर लावून मजबूत स्थितीत तर पोहोचला आहे. मात्र सुपर ८ मध्ये जायचं असेल, तर इंग्लंडला ऑस्ट्रेलियाच्या विजयाची प्रार्थना करावी लागणार आहे. जर या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर इंग्लंडचा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. मात्र जर स्कॉटलंडने हा सामना जिंकला किंवा सामना पावसामुळे रद्द झाला, तर स्कॉटलंडचा संघ सुपर ८ साठी पात्र ठरेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी इंग्लंडचा जोरदार पाठिंबा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com