Virat Kohli Viral Video twitter
Sports

Viral Video: 'कोहली को बॉलिंग दो..'LIVE सामन्यात फॅन्सची मागणी! विराटच्या खास अंदाजाने जिंकले मन,Video

Virat Kohli Viral Video: या सामन्यातील विराटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडयावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Viral Video:

भारतीय संघाने श्रीलंकेला ३०२ धावांनी पराभूत करत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ३५८ धावांचे आव्हान ठेवले होते.

या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला. फलंदाजीत विराट, गिल आणि अय्यरने धुमाकूळ घातल्यानंतर धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी देखील दमदार खेळ केला.

सिराज, शमी आणि बुमराहने एकापाठोपाठ एक फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान सामना पाहण्यासाठी आलेले फॅन्स कोहलीला गोलंदाजी करु देण्याची मागणी करत होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना ३५७ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना अवघ्या १४ धावांवर श्रीलंकेचे ६ फलंदाज तंबूत परतले होते.

त्यानंतर स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले फॅन्स,'कोहली को बॉलिंग दो..'चे नारे देताना दिसून आले. (Kohli Ko Bowling Do)

फॅन्सने मागणी केल्यानंतर कोहली देखील गोलंदाजी करण्यासाठी वॉर्मअप करताना दिसून आले. कोहलीचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलयचं झालं तर या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता.

भारतीय संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने ५० षटकअखेर ८ गडी बाद ३५७ धावा केल्या.

तर या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने ३ आणि जसप्रीत बुमराहने १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT