नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीनं पुन्हा एकदा इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल मध्ये छाप टाकली आहे. विराट गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानावार धावांचा पाऊस पाडत आहे.
टी20 वर्ल्डकप 2022 मध्येही त्याने (Virat Kohli) अप्रतिम फलंदाजी करून धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीला आयसीसीनं प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केलं आहे. वर्ल्डकप मध्ये कोहलीनं तीन अर्धशतक ठोकून टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. (virat kohli facilitated by icc player of the month award for October 2022)
आयसीसीच्या या पुरस्कारासाठी पुरुष गटात विराट कोहली सोबत झिम्बाब्वे टीमचा फंलदाज सिकंदर रजा, दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलरलाही नामांकित केलं होतं. मात्र, हा पुरस्कार कोहलीला देण्यात आला. विराटला हा पुरस्कार पहिल्यांदाज मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात अप्रतिम कामगिरी केल्यामुळं विराटला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
वर्ल्डकप मध्ये कोहलीची 'विराट' खेळी
मागील तीन वर्षांपासून विराट कोहली धावांसाठी संघर्ष करत होता. खराब फॉर्ममुळं त्याच्यावर टीका-टीपण्णही करण्यात आली. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून विराटने मैदानात पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केलीय. या टी20 वर्ल्डकपमध्ये कोहलीने आतापर्यंत सर्वात जास्त 246 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तान विरुद्ध (नाबाद 82 धावा), नेदरलॅंड (नाबाद 62) आणि बांगलादेश (नाबाद 64 धावा) विराटने केल्या आहेत.
टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये विराटची कामगिरी
सामने- 5
धावा - 246
फिफ्टी - 3
सरासरी : 123
महिला गटात पाकिस्तानच्या निदा डारला पुरस्कार
आयसीसीने आज सोमवारी 7 नोव्हेंबरला पुरुष आणि महिला गटासाठी ऑक्टोबर महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्डची घोषणा केली. पुरुष गटात विराट कोहलीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर महिला गटात पाकिस्तानची निदा डारला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.