Suryakumar Yadav T20 World Cup: सूर्यकुमार यादवचा गेम प्लान माहितेय का? पत्नी देविशाच्या एका नियमानं केली जादू

सूर्यकुमारचा गेम प्लान जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Suryakumar Yadav with wife Devisha
Suryakumar Yadav with wife Devishasaam tv
Published On

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत करून भारतानं गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवण्यात नेहमीप्रमाणे कालच्या सामन्यातही सूर्यकुमार यादव तळपला. २५ चेंडूत ६१ धावांची आक्रमक खेळी करून सुर्यकूमारने झिम्बाब्वेच्या संघाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सूर्यकुमारने (Suryakumar yadav) या सामन्यात चार षटकार आणि सहा चौकार ठोकून ६१ धावांची खेळी साकारली. कमालीच्या फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारने वर्ल्डकप मध्ये आतापर्यंत पाच सामन्यांत तीन अर्धशतक झळकावले आहेत. एव्हढच नाही, टी20 क्रिकेट मध्ये एका वर्षात एक हजार धावा करणारा सूर्यकुमार भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने रचलेल्या इतिहासाची पाने क्रिडा विश्वातील सर्वच दिग्गज खेळाडू उलगडताना दिसत आहे. संपूर्ण क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Suryakumar yadav outstanding innings game plan Indian cricket team latest update)

Suryakumar Yadav with wife Devisha
भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीला ओव्हरटेक, बिबट्यानं दोघांवर हल्ला चढवला, काळजाचा थरकाप उडवणारा Viral Video

क्रिकेटच्या मैदानात सूर्यकुमारने धावांचा पाऊस पाडला आहे. चारही बाजूला चौकार षटकार ठोकण्याचं कौशल्य सूर्यकुमारने त्याच्या खेळीतून दाखवलं आहे. म्हणून त्याला 360 डिग्री प्लेयर म्हणून संबोधलं जात आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव टी20 रॅंकिंगमध्ये नंबर वन फलंदाज बनला आहे. पण सूर्यकुमारचा गेम प्लान जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जाणून घेवूयात सूर्यकुमार गेम प्लान काय आहे?

Suryakumar Yadav with wife Devisha
India VS England: सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची प्लेईंग 11 बदलणार? कोच राहुल द्रविडचे संकेत

पत्नीचा नियम सूर्यकुमारचा आत्मविश्वास वाढवतो

सामना सुरु होण्याआधी सुर्यकूमार दोन नियम पाळतो. एक नियम त्याचा स्वत:चा आहे आणि दुसरा नियम पत्नी देविशाचा आहे. सूर्यकुमारची पत्नी देविशा जवळपास प्रत्येक दौऱ्यात त्याच्या सोबत असते. सामना सुरु होण्याआधी प्रत्येक वेळी एक नियम पाळत असते.ती सूर्यकुमारचा फोन खूप वेळ आधीच तिच्याजवळ ठेवत असते. त्यामुळे सूर्यकुमारला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. याच कारणामुळं सूर्यकुमार एका वेगळ्या झोनमध्ये असतो आणि सरावात सातत्य ठेवून चमकदार कामगिरी करत असतो.

'चार वर्षांपासून एकच गेम प्लान फॉलो करतो'

सामना असल्यावर एक दिवस आधी काय गेम प्लान असतो? असा प्रश्न सूर्यकुमारला विचारण्यात आला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सूर्यकुमारने सांगितलं होतं, 'मागील चार वर्षांपासून मी एकच रणनीतीवर काम करतो आहे. यामुळं मला खूप फायदा झाला आहे. सामन्याच्या एक दिवस आधी मी सुट्टी घेतो. जेवढापण सराव करायचो असतो, तो मी दोन दिवसांपूर्वीच करतो.' सूर्यकुमारनं पुढं म्हटलं, एक दिवस आधी मी माझ्या पत्नीसोबत टाईम शेअर करतो. क्रिकेटबद्दल काही चर्चा करत नाही. मी चांगला खेळलो किंवा नाही, माझी पत्नी कोणत्याही परिस्थितीत मला सहकार्य करत असते. तीनं मला ठणकावून सांगितलं आहे, तु जसा होता, तसाच राहा, जरी तूझ्याकडून काही चांगलं होत नसेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com