India VS England: सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची प्लेईंग 11 बदलणार? कोच राहुल द्रविडचे संकेत

राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्ये बदल करण्याचे संकेत दिले, कारण...
Indian Cricket Team
Indian Cricket Teamsaam tv
Published On

Suryakumar Yadav: ऑस्ट्रे्लियात टी20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु असून भारताने काल रविवारी झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेला 71 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे सुपर 12 मधील ग्रुप-2 मध्ये भारताने आठ गुण प्राप्त करून पाकिस्तानला पिछाडीवर टाकलं आहे. भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी असून गुरुवारी 10 नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलचा (India vs England) सामना खेळणार आहे.

अशातच भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. अॅडलेडच्या मैदानात भारत-इंग्लंड आमने सामने येणार असून कोच राहुल द्रविडने यासाठी खास तयारी केली आहे. (Team india playing 11 might change as coach rahul dravid gives indication)

Indian Cricket Team
India Vs England T20 Semi Final: सेमीफायनल मध्ये भारत-इंग्लंड भिडणार, जाणून घ्या संपूर्ण शेड्युल

द्रविडने म्हटलं की, अॅडलेडच्या परिस्थितीनुसार भारतीय प्लेईंग 11 मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील. लेग स्पिनर युजवेंद्र चहलला प्लेईंग-11 मध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण अॅडलेडच्या पिचवर फिरकीपटूंना चागंली मदत मिळते. तसंच अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिकचंही संघात पुनरागमन होऊ शकतं. दरम्यान, रिषभ पंतला पुन्हा विश्रांती दिली जाऊ शकते.

15 खेळाडूंमधून कोणालाही संधी मिळणार

भारतीय कोच द्रविडने म्हटलं, आम्ही बांगलादेश विरुद्ध ज्या पिचवर खेळलो होतो, मात्र, तिथे फिरकीपटूंना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. हा एक वेगळ्या प्रकारचा पिच होता. अॅडलेड मध्ये अशाच प्रकारची वेगळं पिच असू शकतं. आमच्याकडे काही दिवस आहेत, आम्ही मैदानावर जाऊन पिच रिपोर्ट घेऊ. त्यानंतर विचार करू. जर हा पिच स्लो वाटला, जर आम्ही त्या परिस्थितीप्रमाणे खेळणार. जर आम्हाला वाटलं की, हा पिच थोडा वेगळा आहे. त्यानंतर आम्हाला या सामन्यासाठी एक टीम बनवावी लागेल. म्हणजेच अॅडलेडच्या मैदानातील पिच रिपोर्टनुसार भारतीय संघाची प्लेईंग 11 ठरवण्यात येईल.

Indian Cricket Team
Suryakumar Yadav: यंदा 'सूर्या' तळपला, टी20 क्रिकेट मध्ये 1000 धावांचा झंझावात, सूर्यकुमारनं इतिहास रचला

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या,आर.अश्विन,युजवेंद्र चहल,अक्षर पटेल,भुवनेश्वर कुमार,हर्षल पटेल,अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

स्टॅंडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com