virat kohli twitter
Sports

IND vs SA, Final: नॉर्मल वाटलोय का? पहिल्याच षटकात विराटचे यान्सेनला 3 क्लासिक चौकार! पाहा VIDEO

Virat Kohli 3 Fours In Marco Yansen Over: विराट कोहलीने मार्को यान्सेनच्या षटकात ३ चौकार मारले आहेत. पाहा व्हिडिओ.

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरु आहे. बारबाडोसच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान डावाची सुरुवात करताना पहिलाच षटकात आपला क्लास दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराटचे ३ चौकार

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत विराटची बॅट शांतच आहे. त्याला स्पर्धेतील एकाही सामन्यात मोठी खेळी करता आलेली नाही. मात्र फायनलमध्ये त्याच्या फलंदाजीचा क्लास पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानावर आली होती. डावाची सुरुवात करताना विराटने पहिल्याच षटकात मार्को यान्सेनच्या पहिल्याच षटकात ३ चौकार मारले आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विराट फलंदाजीला आला. तर दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेन पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्याने पहिला चौकार कव्हरच्या दिशेने मारला. तर त्यानंतर यान्सेनने पुढील चेंडू विराटच्या पॅडवर टाकला. या चेंडूवर त्याने मिड विकेटच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर तिसरा चौकार त्याने बाणाप्रमाणे सरळ मारला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर,कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, मार्को जॅन्सन, केशव महाराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

Crime News : धक्कादायक! मुतखड्याचं ऑपरेशन, डॉक्टरांनी तरूण शेतकऱ्याची किडनीच गायब केली

मोठी बातमी! HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT