T20 World Cup 2024: या 5 शिलेदारांच्या बळावर टीम इंडियाने गाठली T-20 WC ची फायनल

Team India Top Performers: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान जाणून घ्या भारतीय संघातील स्टार कामगिरी करणारे खेळाडू.
T20 World Cup 2024: या 5 शिलेदारांच्या बळावर टीम इंडियाने गाठली T-20 WC ची फायनल
team indiatwitter

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. वनडे वर्ल्डकप २०२४ स्पर्धेप्रमाणेच भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतही सर्व सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सुपर ८ मध्ये पराभूत केलं आहे. दरम्यान भारतीय संघाचा फायनलचा सामना २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दरम्यान जाणून घ्या कोण आहेत भारतीय संघातील टॉप ५ स्टार खेळाडू.

रोहित शर्मा

भारतीय संघाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा फलंदाज म्हणून तर हिट ठरला आहे. यासह कर्णधार म्हणून तो सुपरहिट ठरला आहे. योग्यवेळी योग्य गोलंदाज, योग्य फिल्डिंग हे त्याने पुन्हा पुन्हा करून दाखवलं आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने सापळा रचून इंग्लंडच्या फलंदाजांची शिकार केली. यासह त्याने भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवलं. दरम्यान आयसीसी टी -२० वर्ल्डकप त्याने आतापर्यंत २४८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने संघाला गरज असताना महत्वपूर्ण खेळी देखील केली आहे.

T20 World Cup 2024: या 5 शिलेदारांच्या बळावर टीम इंडियाने गाठली T-20 WC ची फायनल
IND vs ENG: टीम इंडियाने करुन दाखवलं! फायनलमध्ये पोहोचताच रोहितला अश्रू अनावर, पाहा भावुक करणारा VIDEO

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने देखील आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत ३६० डिग्री फलंदाजी केली आहे. त्याने या स्पर्धेत फलंदाजी करताना १९६ धावा केल्या आहेत. अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात ज्यावेळी भारतीय संघ अडचणीत होता. त्यावेळी सूर्याने शानदार अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. यासह प्रत्येक सामन्यात ताबडतोड फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.

कुलदीप यादव

फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर असणाऱ्या खेळपट्टीवर कुलदीप यादवचे चेंडू बुमरॅंग सारखे इकडे तिकडे होताना दिसून आले आहेत. त्याने टाकलेला चेंडू हा फलंदाजांना कळतच नाहीये. सेमिफायनलच्या सामन्यातही त्याने महत्वाच्या विकेट्स काढून दिल्या. दरम्यान या स्पर्धेत त्याने आतापर्यंत १० फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. फायनलमध्येही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

T20 World Cup 2024: या 5 शिलेदारांच्या बळावर टीम इंडियाने गाठली T-20 WC ची फायनल
IND vs ENG Semi Final : रोहित- सूर्याची दमदार सुरुवात; इंग्लिश गोलंदाजांचा भेदक मारा! टीम इंडियाचं इंग्लंडसमोर १७२ धावांचं आव्हान

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला विकेटची गरज असते. त्यावेळी रोहित बुमराहच्या हातात चेंडू सोपवतो. बुमराह कधीच रोहितला निराश करत नाही. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने सॉल्टला बाद करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. त्याच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १० फलंदाजांना माघारी धाडलं आहे. फायनलमध्येही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अर्शदीप सिंग

भारतीय संघाला गेल्या कित्येक वर्षांपासून डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज होती. तो सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकात भारतीय संघाला विकेट मिळवून देईल. अर्शदीप सिंग ही भूमिका योग्यरित्या पार पाडतोय. या स्पर्धेत तो भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com