R Ashwin- Kuldeep Yadav: मन जिंकलस भावा! मैदानाबाहेर जाताना अश्विनने कुलदीपसाठी जे केलं ते एकदा पाहाच -Video

India vs England 5th Test : इंग्लंडचा डाव आटोपल्यानंतर जेव्हा भारतीय खेळाडू बाहेर जात होते, तेव्हा असं काही घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाव व्हायरल होत आहे.
heart warming gesture from r ashwin handed the ball to kuldeep yadav while going out of the ground india vs england 5th test
heart warming gesture from r ashwin handed the ball to kuldeep yadav while going out of the ground india vs england 5th test twitter
Published On

R Ashwin- Kuldeep Yadav Viral Video:

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ वा आणि मालिकेतील शेवटचा सामना हा आर अश्विनसाठी अतिशय खास आहे. कारण भारताचा दिग्गज गोलंदाज आर अश्विनसाठी हा १०० वा कसोटी सामना आहे. या सामन्यातील पहिल्या डावात आर अश्विनने ४ गडी बाद केले. तर दुसरीकडे कुलदीप यादवने सर्वाधिक ५ गडी बाद केले. दरम्यान इंग्लंडचा डाव आटोपल्यानंतर जेव्हा भारतीय खेळाडू बाहेर जात होते, तेव्हा असं काही घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाव व्हायरल होत आहे.

कुलदीप यादवचं मन जिंकणारं कृत्य..

आर अश्विन हा आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. देशासाठी १०० कसोटी सामने खेळणं ही कुठल्याही क्रिकेटपटूसाठी अभिमानास्पद बाब असते. यासह अश्विनने १०० व्या कसोटीतही शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. तर कुलदीप यादवने ५ फलंदाजांना माघारी धाडलं.

heart warming gesture from r ashwin handed the ball to kuldeep yadav while going out of the ground india vs england 5th test
IND vs ENG 5th Test, Toss Update: प्रतिष्ठा राखण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात! टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग ११

ज्यावेळी इंग्लंडचा डाव आटोपला त्यावेळी भारतीय खेळाडू मैदानाबाहेर जात होते. चेंडू कुलदीप यादवच्या हातात होता. मात्र त्याने १०० वा सामना खेळत असलेल्या आर अश्विनच्या हातात दिला. मात्र आर अश्विनने हा चेंडू घेण्यास नकार दिला आणि पुन्हा तो चेंडू कुलदीप यादवकडे दिला. त्यानंतर मोहम्मद सिराजने मध्यस्थी केली आणि चेंडू आर अश्विनला दिला. (Cricket news in marathi)

मात्र पुन्हा एकदा आर अश्विनने चेंडू कुलदीप यादवकडे सोपवला. अश्विनचं म्हणणं होतं की, १०० वा कसोटी सामना असला तरीदेखील कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली आहे. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

heart warming gesture from r ashwin handed the ball to kuldeep yadav while going out of the ground india vs england 5th test
Dhruv Jurel Stumping: 'पुढे जातोय बघ..' ,ध्रुव जुरेलचा तो एक कॉल अन् ओली पोपचा 'करेक्ट कार्यक्रम' -Video

इंग्लंडचा डाव २१८ धावांवर आटोपला..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २१८ धावांवर संपुष्टात आला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने २९, जो रुटने २६ आणि बेन फोक्सने २४ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ५, आर अश्विनने ४ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com