IND vs SA, Final: इंग्लंडच्या दिग्गजाची सामन्याआधी मोठी भविष्यवाणी! सांगितलं कोण मारणार फायनलमध्ये बाजी

Micheal Vaughan Winner Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे.
IND vs SA, Final: इंग्लंडच्या दिग्गजाची सामन्याआधी मोठी भविष्यवाणी! सांगितलं कोण मारणार फायनलमध्ये बाजी
ind vs satwitter

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीतील सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात कोणता संघ जिंकणार याबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी केली आहे. दरम्यान नेहमी भारतीय खेळाडूंवर टीका करणाऱ्या मायकल वॉनने या सामन्यात कोणता संघ जिंकणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेवर भारी पडू शकतो. दरम्यान त्याने विराट कोहलीबाबतही मोठी भविष्यवाणी केली आहे.

मायकल वॉनने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, ' बारबाडोसमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेवर भारी पडू शकतो. या सामन्यात विराट कोहली अर्धशतकी खेळी करेल आणि भारतीय संघाला विजय मिळवून देईल. ही माझी भविष्यवाणी आहे.' मायकल वॉन यावेळी भारतीय संघाच्या बाजुने बोलताना दिसून आला आहे. मात्र यापूर्वी त्याने अनेकदा भारतीय संघावर टीका केली आहे. यासह भारतीय संघ सेमिफायनलमध्ये जाण्यावरुन त्याने आयसीसीवरही आरोप केले होते.

IND vs SA, Final: इंग्लंडच्या दिग्गजाची सामन्याआधी मोठी भविष्यवाणी! सांगितलं कोण मारणार फायनलमध्ये बाजी
T20 World Cup IND Vs SA: टॉस गेला की सामनाही गेला; असा रहिलाय टी२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचा इतिहास

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वी त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने लिहिले की, 'भारतीय संघाने जर या सामन्यात विजय मिळवला, तर या संघात ती क्षमता आहे की, हाच संघ आणखी आयसीसीच्या ट्रॉफी जिंकू शकतो.' भारतीय संघाने २०१३ मध्ये शेवटची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर १० वर्ष होऊन गेले आहेत.

IND vs SA, Final: इंग्लंडच्या दिग्गजाची सामन्याआधी मोठी भविष्यवाणी! सांगितलं कोण मारणार फायनलमध्ये बाजी
Ind vs SA T20 WC Match Live Updates : टीम इंडियाने जिंकला टॉस; आफ्रिकेसमोर ठेवणार मोठं आव्हान

मात्र भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २००७ मध्ये पहिल्यांदाच आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळवली गेली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र या सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाला २००७ नंतर आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com