Virat kohli completes century of half centuries in t20 cricket creates big record  twitter
Sports

Virat Kohli Record News: विराटचं अर्धशतकांचं शतक पूर्ण! असा रेकॉर्ड करणारा ठरलाय पहिलाच भारतीय फलंदाज

RCB vs PBKS, IPL 2024: या सामन्यात विराट कोहलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान या अर्धशतकी खेळीसह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Half Centuries Record:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्याने चौफेर फटकेबाजी करत पंजाब किंग्जच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चिन्नास्वामीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं .यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

गेल - वॉर्नरच्या यादीत प्रवेश..

विराट कोहलीने या सामन्यात ४९ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. १५७.१४ च्या स्ट्राइक रेटने धावा करत त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

विराट कोहलीने टी -२० क्रिकेटच्या इतिहासात १०० वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली हा १०० वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. या रेकॉर्डसह त्याने डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेलसारख्या फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे.

विराटने रचला इतिहास..

विराट कोहलीने हा कारनामा ३७८ व्या इनिंगमध्ये करून दाखवला आहे. तर वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलने हा कारनामा ४६३ सामन्यांमध्ये केला. आता या यादीत विराट कोहलीने देखील प्रवेश केला आहे. विराट कोहली या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या स्पर्धेतील २ सामन्यांमध्ये ९८ धावा केल्या आहेत. (Cricket news in marathi)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली.

पंजाबने २० षटकअखेर ६ गडी बाद १७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. हे आव्हान रॉयल चॅलेजर्स बंगळुरु संघाने ४ गडी राखून पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT