RCB vs PBKS: सामन्यादरम्यान कोहलीच्या चाहत्याचा राडा, सुरक्षेला भेदत थेट पोहोचला विराटजवळ अन्...

RCB vs PBKS: आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल ६५० चौकार पूर्ण केलेत. सात चौकार मारत विराटने नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. विराट कोहलीने आतापर्यंतं आयपीएलचे २३८ सामने खेळले असून यात ७ शतक आणि ५० अर्धशतक केले आहेत.
Virat Kohli Fan
Virat Kohli Fansaom

RCB vs PBKS Virat Kohli Fan Entered in Ground:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. विराटला भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जात असतात आणि काहीही करण्यास तयार असतात. अशाच एका चाहत्याने पंजाब किंग्स आणि आरसीबीचा सामना सुरू असताना राडा केलाय. (Latest News)

एका व्यक्तीने सुरक्षा यंत्रणेला भेदत मैदानात प्रवेश केला. मैदानात प्रवेश करताच तो सरळ विराट कोहलीच्या दिशेने धावू लागला. विराटला काही कळण्याआधी चाहता त्याच्याजवळ पोहोचला आणि विराट कोहलीच्या पाया पडू लागला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्याला मैदानाबाहेर काढले. आरसीबीच्या डावात ही घटना घडल्याने सामना काही काळ थांबला होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आयपीएल 2024 चा साहवा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. धवनच्या नेतृत्वाखालील संघाने २० षटकात ६ गडी गमावत १७६ धावा केल्या आणि आरसीबीसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले.

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये ६५० चौकार पूर्ण केले आहेत. त्याने ७ चौकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला. या धडाकेबाज फलंदाजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत २३८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ७ शतके आणि ५० अर्धशतकांच्या मदतीने ७२८४ धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात किंग कोहलीने चेन्नईविरुद्ध एका षटकाराच्या मदतीने २१ धावा केल्या होत्या. या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला होता.

Virat Kohli Fan
Arvind Kejriwal: 'आप'ने आंदोलन केलं तीव्र, केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पक्षाने होळीच साजरी केली नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com