Arvind Kejriwal News Update
Arvind Kejriwal News Updatesaam tv

Arvind Kejriwal: 'आप'ने आंदोलन केलं तीव्र, केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पक्षाने होळीच साजरी केली नाही

AAP News: आज संपूर्ण देश रंगांचा सण होळी साजरी करत आहे. मात्र आम आदमी पक्षाने आपले नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन सुरूच ठेवले आहे.
Published on

Arvind Kejriwal News Update:

आज संपूर्ण देश रंगांचा सण होळी साजरी करत आहे. मात्र आम आदमी पक्षाने आपले नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन सुरूच ठेवले आहे. याचबद्दल माध्यमांशी संवाद असाधताना दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी म्हणाल्या आहे की, ''यंदा होळी न साजरी करण्याचा संकल्प केला आहे.''

आतिशी म्हणाल्या की, होळी हा केवळ एक सण नाही, तर वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, क्रूरतेवर न्यायाचे प्रतीक आहे. आम आदमी पक्षाचा प्रत्येक नेता या वाईट, क्रूरता आणि अन्यायाविरुद्ध लढत आहे, असे त्या सोमवारी संध्याकाळी म्हणाल्या. यासोबतच आतिशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, "आम्ही रंगांशी खेळणार नाही, आम्ही होळी साजरी करणार नाही."  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arvind Kejriwal News Update
Kalyan News: तळीरामांचा रुग्णालयातचं शिमगा, अपघातानंतर उपचार नको म्हणून ठोकल्या बोंबा; समजूत काढताना पोलिसांचीही दमछाक

अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आतिशी यांनी लिहिले, "एका क्रूर हुकूमशहाने दिल्लीचे लाडके मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. तुम्ही लोकशाही नष्ट करण्याच्या तुमच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडली नाही.''  (Latest Marathi News)

त्यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, ''या होळीच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, तुम्ही क्रूरतेच्य विरोधात बाहेर पडा. या लढ्यात सामील व्हा. हा केवळ आम आदमी पक्षाचा लढा नाही, तर संपूर्ण दिल्ली आणि देशाची लोकशाही वाचवण्याची लढाई आहे.''

Arvind Kejriwal News Update
Mumbai News: मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई, लिओन देशाच्या नागरिकांकडून 20 कोटींचे कोकेन केले जप्त

याआधीही आतिशी यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, "होलिका दहनाच्या दिवशी दिल्लीच्या प्रत्येक विधानसभेत लोक हुकूमशहांनाही जाळत आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक करून मोदीजींनी मोठी चूक केली आहे. फक्त आपच नाही तर संपूर्ण दिल्ली आणि देश याला उत्तर देईल. त्यांनी केजरीवाल यांना तुरुंगात टाकले, पण मी शपथ घेते, आता आपचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता अरविंद केजरीवाल म्हणून रस्त्यावर उतरेल आणि या देशातून हुकूमशहाला सत्ते बाहेर करेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com