Mumbai News: मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई, लिओन देशाच्या नागरिकांकडून 20 कोटींचे कोकेन केले जप्त

DRI Action News: महसूल गुप्तचर संचालनालयाने (DR) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. नैरोबीहून मुंबईला आलेल्या आणि सिएरा लिओनचे नागरिकत्व असणाऱ्या एका महिला प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर, रविवार ताब्यात घेतले.
DRI Action News
DRI Action NewsSaam Tv

Mumbai News:

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DR) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. नैरोबीहून मुंबईला आलेल्या आणि सिएरा लिओनचे नागरिकत्व असणाऱ्या एका महिला प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर, रविवार ताब्यात घेतले.

या महिला प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता ती नेत असलेल्या वस्तू उदा. बुट, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली आणि अँटी-पर्स्पिरंट्स हे विलक्षण जड होते. महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीत या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या शिताफीने लपवलेली पांढरी पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटचा वापर करून या पदार्थाची चाचणी केल्यावर त्यात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

DRI Action News
Jalna News: होळीच्या दिवशीच गावावर शोककळा, मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

एकूण 1979 ग्रॅम पांढऱ्या पावडरच्या रुपातील जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे बाजार मूल्य अंदाजे 19.79 कोटी आहे. यावेळी या महिला प्रवाशाने आपला जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली.त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.  (Latest Marathi News)

महसूल गुप्तचर संचालनालयाने भारतातील मादक द्रव्यांच्या धोक्याशी लढा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पूनरुच्चार केला तसेच, प्रतिबंधित अमली पदार्थ लपविण्याची नवीन पद्धत शोधून पुन्हा उच्च व्यावसायिक मानके स्थापन करण्यात रस दाखवला.

DRI Action News
Mumbai News: मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, 5146 बेशिस्त चालकांना ठोठावला दंड

भारत-नेपाळ सीमेवरून अमली पदार्थाची तस्करी

दरम्यान, याआधी डीआरआयने एका अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. डीआरआय अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत सुमारे 15 कोटी रुपये मूल्याचे 1.59 किलो कोकेन जप्त केले होते. ही टोळी आफ्रिकेतून भारत-नेपाळ सीमेवरून भारतात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या पदार्थांची (एनडीपीएस ) तस्करी करत होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com