Mumbai News: मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, 5146 बेशिस्त चालकांना ठोठावला दंड

Mumbai Traffic Police: मुंबईमध्ये होळी आणि धुळवडीसाठी पोलिस ठाण्यांसह वाहतूक पोलिसांनी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले.
Mumbai Traffic Police
Mumbai Traffic PoliceSaam Tv

>> संजय गडदे

Mumbai Traffic Police:

मुंबईमध्ये होळी आणि धुळवडीसाठी पोलिस ठाण्यांसह वाहतूक पोलिसांनी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले.

मात्र आज दिवसभरात होळी, धुळवडीत बेशिस्तपणे वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या ४२८ वाहन चालक, तसेच १२४ दारुड्या चालकांचा समावेश असून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४५९४ जणांवर कारवाई करण्यात आली. ही आकडेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ची आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Traffic Police
Nagapur News: होळी साजरी करताना वाद! नागपूरच्या उमरेडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, VIDEO आला समोर

मुंबईत होळी आणि धुळवड या सणांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. या सणांच्या दिवशी अनेक जण मद्यपान करून वाहने चालवत असतात आणि अपघातांना निमंत्रण देखील देत असतात.  (Latest Marathi News)

याच सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांसोबतच मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईमध्ये होळी आणि धुळवडीसाठी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले.

Mumbai Traffic Police
Congress 6th List: काँग्रेसने 6वी यादी केली जाहीर, ओम बिर्ला यांच्याविरोधात उतरवला तगडा उमेदवार

दोन दिवसात ५१४८ बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांचा आकडा सर्वाधिक म्हणजे ४५९४ इतका आहे. याशिवाय एका दुचाकीवरून दोन पेक्षा जास्त प्रवास केल्याबद्दल ४२८ तर निष्काळजीपणे किंवा बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल १२४ जणांविरोधात कारवाई केली गेली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com