लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे. यात राजस्थानमधील 4 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे आणि तामिळनाडूतून एक उमेदवार आहे. म्हणजेच या यादीत एकूण 5 नावांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रल्हाद गुंजाळ हे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांचा सामना भाजप नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी होणार आहे. प्रल्हाद गुंजाळ यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजमेरमधून रामचंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच राजसमंदमधून सुदर्शन रावत आणि भिलवाडामधून दामोदर गुर्जर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तमिळनाडूतील तिरुनेलवेली येथून अधिवक्ता रॉबर्ट ब्रूस यांना तिकीट देण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यासोबतच काँग्रेसने तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारही जाहीर केले आहेत. विलावनकोड जागेवर डॉ. थरहाई कुथबर्ट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)
राजस्थान, अजमेर- रामचंद्र चौधरी
राजस्थान, राजसमंद - सुदर्शन रावत
राजस्थान, भिलवाडा - डॉ.दामोदर गुर्जर
राजस्थान, कोटा - प्रल्हाद गुंजाळ
तामिळनाडू, तिरुनेलवेली - रॉबर्ट ब्रुस
दरम्यान, याआधी रविवारी काँग्रेसने पाचवी यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आहे. जयपूरमधून काँग्रेसचे उमेदवार सुनील शर्मा यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेले प्रताप सिंह खाचरियावास येथून रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून आतापर्यंत एकूण 6 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये एकूण 190 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.