आज रंगपंचमीनिमित्त तळीरामांची चांगलीच चंगळ झाल्याची पाहायला मिळाली. यातच आज सायंकाळी रंगांचा बेरंग झाला. आज सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या वाळधुनी पुलावर एका बाईकवरून एक व्यक्ती पडला आणि गंभीर जखमी झाला. जखमी झाल्याने ट्राफिक वॉर्डनने त्याला उचलून उपचारासाठी रुग्णालयात आणले. त्याच्या पाठोपाठ त्याच्यासोबत असलेला दुचाकीस्वार देखील तिकडे दाखल झाला.
दोघांनी उपचार नको आम्हाला जाऊ द्या, असे सांगत रुग्णालयात जवळपास अर्धा ते पाऊण तास धिंगाणा घातला. मी मुंडेंचा नातेवाईक आहे, पत्रकार आहे, असं सांगत हा धिंगाणा जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरू होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या दोघांनी यावेळी ट्राफिक वॉर्डनसह पोलिसांशीही अरेरावी केली. त्यांचा अवतार बघून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने दोघांना पुन्हा गाडीवर बसून घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र आता या दोघांना सहजासहजी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. (Latest Marathi News)
पोलिसांनी या दोघांना सोडून दिल्यावर हे दोघे रुग्णालयाबाहेर पडले. मात्र हे दोघेही मद्यपी रुक्मिणी रुग्णालयातून बाहेर पडले आणि काही अंतरावर जात नाही तोच पुन्हा त्यांचा अपघात झाला व आजूबाजूच्या नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात आणलं.
मात्र रुग्णालयात पुन्हा या दोघांनी धिंगाणा घालण्यात सुरुवात केली होती. त्यांना समजवता समजवता पोलिसांसह रुग्णालयिन कर्मचाऱ्यांचे देखील नाकी नऊ आले होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघे धिंगाणा घालताना दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.