IPL 2024, Points Table: आरसीबीच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! पाहा कोणता संघ कितव्या स्थानी?

IPL 2024 Points Table Latest Updates: आयपीएल २०२४ स्पर्धेत सोमवारी (२५ मार्च) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
IPL 2024 Latest points table updates after rcb vs pbks match royal challengers bangalore vs punjab kings
IPL 2024 Latest points table updates after rcb vs pbks match royal challengers bangalore vs punjab kings twitter
Published On

IPL 2024,Points Table Latest Updates:

आयपीएल २०२४ स्पर्धेत सोमवारी (२५ मार्च) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आपला पहिला सामना गमावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अखेर विजयाचा नारळ फोडला आहे. दरम्यान या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फरक पडला आहे.

या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या स्थानी आहे आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ दुसऱ्या आणि गुजरात टायटन्सचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

IPL 2024 Latest points table updates after rcb vs pbks match royal challengers bangalore vs punjab kings
IPL 2024 MI-GT: रोहित-हार्दिकच्या चाहत्यांची हाणामारी; स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये एकमेकांना लगावले थप्पड

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्जचा संघ पाचव्या आणि आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. या सर्व संघांनी आपला पहिला सामना जिंकला असून सर्व संघांचे प्रत्येकी २-२ गुण आहेत. तर मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. गुणतालिकेतील टॉप ४ संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार आहे. (Cricket news in marathi)

IPL 2024 Latest points table updates after rcb vs pbks match royal challengers bangalore vs punjab kings
RCB vs PBKS IPL 2024: आज पंजाब आणि बेंगळुरूमध्ये सामना; घरच्या मैदानात RCB मारणार बाजी? जाणून दोन्ही संघातील प्लेइंग ११

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटक अखेर ६ गडी बाद १७६ धावा केल्या. पंजाबकडून फलंदाजी करताना शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com