RCB vs PBKS IPL 2024: आज पंजाब आणि बेंगळुरूमध्ये सामना; घरच्या मैदानात RCB मारणार बाजी? जाणून दोन्ही संघातील प्लेइंग ११

RCB vs PBKS: आज संध्याकाळी साडेसात वाजता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
RCB vs DC IPL 2024
RCB vs DC IPL 2024Saam Tv
Published On

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings:

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील पहिला सामना बेंगळुरू आणि चेन्नईच्या संघात झाला. या पहिल्या सामन्यात बेंगळुरूला पराभव स्वीकारावा लागला. आज आरसीबी आयपीएलचा दुसरा सामना खेळत आहे. या सामन्यात आरसीबी उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीचं प्रदर्शन करेल का हे,पाहावे लागेल. या दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा सामना पंजाब किंग्सशी होत आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. (Latest News)

दरम्यान बेंगळुरूच्या संघाला या सामन्यात उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. पहिल्या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून आलं. चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या वेगवान गोलंदाजांनी शॉर्ट पिच चेंडू टाकले. तसेच चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फारसे उपयुक्त ठरली नाही. आरसीबीचे ३ फिरकी गोलंदाज मयंक डागर, कर्ण शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मिळून ५ षटके टाकली. पण त्यांना फलंदाजांना बाद करण्यात यश आले नाही. या तिघांनी मिळून केवळ ३७ धावा देत एक विकेट घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सीमारेषा छोटी आहे, त्यामुळे आरसीबीच्या फिरकीपटूंना उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करावे लागेल. या स्टेडियमवर बहुतेक प्रसंगी संघाने एका डावात २०० हून अधिक धावा केल्यात. २०० धावांचे आव्हान ठेवण्याची किमया २७ वेळा घडलीय. या खेळपट्टीवर आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७२ आहे. यामुळे आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनाही पंजाब किंग्जविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल.

चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामना जिंकायचा असेल एकाच रणनितीचा अवलंबून राहावे लागणार नाही. सुरुवातीच गडी बाद झाल्यानंतर आरसीबीने सीएसकेविरुद्ध ६ विकेट्सवर १७३ धावा केल्या. आरसीबीने ७५ धावामध्ये ५ विकेट गमावल्या होत्या, परंतु दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी चांगला खेळ करत धावसंख्या १७० च्या पुढे नेली. परंतु खालच्या क्रमाकावरील खेळाडू चांगली कामगिरी करतील असं नाही. त्यामुळे पण प्रत्येक वेळी खालची फळी विश्वासार्ह ठरू शकत नाही कारण विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या वरिष्ठ खेळाडूंना मोठी खेळी खेळावी लागेल.

या मैदानावर आरसीबीने गेल्या ५ रात्रीच्या सामन्यांपैकी ४ सामने गमावले आहेत. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पंजाब किंग्सविरुद्ध चांगला खेळ खेळतो. प्लेसिसने पंजाबविरुद्ध ५४, ९६, ८७*, ४८, ३६*, ७६, ८८, १० आणि ८४ धावा केल्यात. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने या मैदानावर डेथ ओव्हर्समध्ये 11.31 च्या इकॉनॉमीने धावा दिल्यात.

खेळपट्टीचा अहवाल

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली मानली जात नाही. येथे सर्वाधिक स्कोअरिंग सामने झालेत. या मैदानावर कोणताही स्कोअर सुरक्षित मानला जात नाही. मात्र यावेळी खेळपट्टीवर भरपूर गवत असल्याने खेळपट्टी वेगळा परिणाम देईल असा अंदाज आहे.

RCB vs DC IPL 2024
IPL 2024 MI-GT: रोहित-हार्दिकच्या चाहत्यांची हाणामारी; स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये एकमेकांना लगावले थप्पड

बेंगळुरू प्लेइंग ११

यष्टिरक्षक - जितेश शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम कुरन (उपकर्णधार), कॅमेरून ग्रीन, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

पंजाब किंग्सचे प्लेइंग ११

शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर

RCB vs DC IPL 2024
IPL 2024: पुन्हा नाही होणार कोहली- धोनीचा सामना; ग्रुप स्टेजमध्ये मोठा बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com