Virat Kohli news  Saam Tv
Sports

Virat Kohli : बेंगळुरु चेंगराचेंगरीसाठी विराट जबाबदार; पोलिसांत गुन्हा, किंग कोहलीचं टेन्शन वाढलं

Virat Kohli News : बेंगळुरु पोलिसांनी विराट कोहलीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अडचणीत भर पडली आहे.

Vishal Gangurde

आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर ४ जून रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती. चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे आनंदाचं वातावरण दु:खात बदललं होतं. या प्रकरणी आरसीबीच्या ४ अधिकाऱ्यांना ६ जून रोजी सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर आता विराट कोहलीच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली विरोधात कब्बन पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेत तपास केला जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. विराट कोहली हा चेंगराचेंगरी जबाबदार असल्याचा वेंकटेश यांचा आरोप आहे. विराट कोहलीवर गुन्हा नोंदवल्याने स्टार खेळाडूचं टेन्शन वाढलं आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने विराट कोहलीला कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

पंजाब किंग्सच्या विरोधात आरसीबीने चांगलं प्रदर्शन करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीने आयपीएलमध्ये १७ वर्षांनी ट्रॉफी जिंकली. आयपीएल २०२५ चा चषक जिंकल्यानंतर आरसीबीचा १७ वर्षांचा दुष्काळ संपला. याच पार्श्वभूमीवर ४ जून रोजी बेंगळुरूत विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

विजयी रॅलीत आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी लाखो चाहते स्टेडियमजवळ आले होते. ३५ हजार क्षमतेच्या स्टेडियमजवळ लाखो लोक आले होते. मात्र, ही रॅली सुरु होण्याआधीच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक जखमी झाले. कर्नाटक सरकारने मृतकांच्या नातेवाईकांना १०-१० लाख रुपये आर्थिक सहाय्य केले. कर्नाटक सरकारच्या घोषणेनंतर आरसीबीनेही मृतांच्या नातेवाईकांना १०-१० लाख रुपयांची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT