संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Ram Temple donation theft protest in Parliament India: संसदेतील अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला तो खासदारांनी केलेल्या अनोख्या आंदोलनानं.. राम मंदिर दानचोरीचा विरोधकांनी कसा समाचार घेतला आणि सरकारची कोंडी केली पाहूयात या रिपोर्टमधून...
Ram Temple donation scam
Ram Temple donation scamsaam tv
Published On

जंतरमंतरवर जमलेल्या जेन-झींनी पेपरफुटीच्या विरोधात पुकारलेलं आंदोलन देशातलं पहिलं वेगळं आंदोलन ठरलं. जेनझींनी आपली कल्पकता सृजनशीलतेचा पुरेपुर वापर करुन सरकारची पुरती कोंडी केली आणि आता याच धर्तीवर राम मंदिरातील दानचोरीवरुन विरोधकांनी सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केलाय. संसदेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी थेट संसदेच्या आवारातच राममंदिरातल्या चंदाचोरीवर अभिनव आंदोलन केलं.....

दबंग नेते अशी ओळख असलेल्या पप्पू यादव संसदेत साधूच्या वेषात अवरतले..संसदेच्या परिसरात मग सुरु झालं राम मंदिर दानचोरीचं रिक्रीएशन.. यावेळी भक्त म्हणून विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीही या स्कीटमध्ये सहभाग घेतल्याचं दिसलं. राम मंदिरात कशी दान चोरी झाली साधू संताच्या वेषातील ढोगींनी रामलल्लाला कसं लुटलं हेच या खासदारांनी संसदेत दाखवून देशाचं लक्ष वेधून घेतलं....

राममंदिरातल्या दानचोरी प्रकरणात पोलीस अजूनही मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी संसदेत वारंवार हा मुद्दा उपस्थित केला. विरोधक नेहमीच संसदेत लक्ष वेधून घेण्यासाठी पोस्टर झळकावणं, काळ्या फिती बांधणं गळ्यात कांदा बटाट्याच्या माळा घालणं हे पाहायला मिळायचं..मात्र पप्पू यादवांनी केलेल्या या अभिनव पथनाट्यानं सत्ताधाऱ्यांसह संपुर्ण देशाचं लक्षही वेधून घेतलं...त्यामुळे राजकीय विश्वात याच आंदोलनाची चर्चा रंगली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com