LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

LPG Rate Today Update News : १ ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली असून घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर कायम ठेवण्यात आले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे एलपीजी दर.
COMMERCIAL LPG CYLINDER PRICE REDUCED FROM AUGUST 1 | DOMESTIC LPG RATES UNCHANGED | UJJWALA SUBSIDY UPDATE
COMMERCIAL LPG CYLINDER PRICE REDUCED FROM AUGUST 1 | DOMESTIC LPG RATES UNCHANGED | UJJWALA SUBSIDY UPDATESaam Tv
Published On
Summary
  • एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर

  • व्यावसायिक सिलेंडर स्वस्त

  • सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर स्वस्त

  • हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायांना दिलासा मिळाला आहे.

महिन्याचा पहिलाच दिवस LPG ग्राहकांसाठी आनंदाचा ठरला आहे. १ ऑगस्टपासून व्यवसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यापाऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता घरगुती सिलेंडर कधी स्वस्त होणार याकडे गृहिणींचे लक्ष लागले आहे.

इंडियन ऑईलने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, दिल्लीमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर तब्बल १९२ रुपयांनी स्वस्त होऊन २,७३८ रुपयांवर आला आहे. पटणामध्ये त्याची किंमत ३,२२७ रुपयांवरून ३,०१८ रुपये झाली असून, लखनऊमध्ये हा सिलेंडर ३,०५२.५० रुपयांवरून २,८६०.५० रुपयांवर उपलब्ध होणार आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMERCIAL LPG CYLINDER PRICE REDUCED FROM AUGUST 1 | DOMESTIC LPG RATES UNCHANGED | UJJWALA SUBSIDY UPDATE
Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

दुसरीकडे, उज्ज्वला योजनेच्या काही लाभार्थ्यांसाठी मात्र ऑगस्ट महिन्यापासून एलपीजी महागणार आहे. १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान चार अनुदानित सिलेंडरचे रिफिल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना यापुढे ३०० रुपयांचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे पूर्ण किंमत मोजावी लागेल. यापूर्वी या योजनेत सिलेंडरवर अनुदान मिळत होते; मात्र यंदाच्या आर्थिक वर्षापासून ते केवळ चार सिलेंडरपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे.

COMMERCIAL LPG CYLINDER PRICE REDUCED FROM AUGUST 1 | DOMESTIC LPG RATES UNCHANGED | UJJWALA SUBSIDY UPDATE
Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

घरगुती सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल नसून मुंबईमध्ये १४.२ किलोचा सिलेंडर ९४१.५० रुपयांना उपलब्ध आहे. बेंगळुरूमध्ये ९४४.५० रुपये, अहमदाबाद आणि गुरुग्राममध्ये ९४९ रुपये, जयपूरमध्ये ९५२.५० रुपये, चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये, कोलकात्यात ९६८ रुपये, लखनऊमध्ये ९७६.५० रुपये, तर हैदराबादमध्ये त्याची किंमत ९९४ रुपयांवर कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com