virat kohli 
Sports

Virat Kohli Birthday Special: वॉशरुममध्ये कोणाला पाहून विराटची बोलती बंद झाली होती? वाचा मजेशीर किस्सा

Happy Birthday Virat Kohli: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय.

Ankush Dhavre

Virat Kohli Birthday Special News In Marathi: भारताचा माजी कर्णधार अनुभवी फलंदाज विराट कोहलीने गेल्या दीड दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं आहे. विराटची एक झलक घेण्यासाठी, त्याच्यासोबत एक फोटो क्लिक करण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

केवळ मैदानावरच नव्हे तर सोशल मीडियावरही विराट कोहलीची हवा आहे. विराट जगातील तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणार ॲथलिट आहे. दरम्यान विराट ५ नोव्हेंबरला आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवशी जाणून घ्या,त्याच्या आयुष्यातील एक खास किस्सा.

विराट कोहली आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. शतकांच्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरला मागे सोडणाऱ्या विराटची बॅट सध्या शांत आहे. मात्र त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा अजूनही कायम आहे. विराटला पाहताच फॅन्स

त्याची भेट घेण्यासाठी तुफान गर्दी करतात. मात्र विराटने जेव्हा भारताच्या स्टार खेळाडूंना पाहिलं होतं, तेव्हा तो देखील शॉक झाला होता.

एका मुलाखतीदरम्यान विराटने हा मजेशीर किस्सा सांगितला. त्याने सांगितलं की, ज्यावेळी तो लंडनमध्ये होता, त्यावेळी त्याने जर्मनीचा दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकरला पाहिलं. त्याला पाहून विराट शॉक झाला होता. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मात्र विराट त्याची भेट घेण्यासाठी पुढे गेलाच नाही. कारण त्याला खात असताना डिस्टर्ब करायचं नव्हतं.

वॉशरूममध्ये झाली भेट

त्यानंतर विराटची आणखी एका दिग्गजासोबत भेट झाली. मात्र यावेळी ठिकाण आणि खेळाडू दोघेही वेगळे होते. यावेळी त्याची भेट फुटबॉलपटू आंद्रे पिर्लोसोबत झाली. दोघेही वॉशरूममध्ये असताना भेटले. यावेळीही विराटला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. म्हणून विराट केवळ, तुम्हाला भेटून बरं वाटलं..' असं म्हणून निघाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT