virat kohli yandex
Sports

Virat Kohli Birthday Special: विराटची पहिली क्रश कोण होती? स्पेशल दिवशी जाणून घ्या कोहलीबद्दल १० खास गोष्टी

Virat Kohli News In Marathi: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली येत्या ५ नोव्हेंबर रोजी ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे.

Ankush Dhavre

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली ५ नोव्हेंबर २०२४ रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला होता. दिल्लीत जन्मलेल्या या मुलाने पुढे जाऊन जगभरात आपल्या नावाचा ठसा उमटवला.

असा एकही क्रिकेट फॅन नसेल, जो विराटला ओळखत नसेल. मात्र क्रिकेटपलीकडे आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत, जे क्रिकेट फॅन्सला माहीत नाहीत. या स्पेशल दिवशी आम्ही तुम्हाला विराटबद्दल माहीत नसलेल्या १० गोष्टी सांगणार आहोत.

  • विराटला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. त्याच्या कुटुंबात कोणीही क्रिकेटपटू नव्हतं. त्याचे वडील पेशाने वकील होते. तर त्याची आई घर सांभाळायची.

  • कोहलीने वयाच्या ३ वर्षापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

  • विराटचं निकनेम चिकू आहे, जे त्याचे बालपणीचे कोच अजित चौधरी यांनी दिलं होतं.

  • क्रिकेटसह विराट अभ्यासातही हुशार होता. त्याने आपलं सुरुवातीचं शिक्षण दिल्लीच्या पश्चिन विहारातील विशाल भारती पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं.

  • विराटने लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. सचिनने १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये केलेली खेळी पाहून विराट या खेळाकडे आकर्षित झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट अॅकेडमीत टाकलं.

  • विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंर ११ डिसेंबर २०१७ मध्ये दोघेही इटलीमध्ये विवाह बंधनात अडकले होते. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

  • विराट कोहली समाजसेवा देखील करतो. गरीब मुलांना मदत करण्यासाठी त्याने कोहली फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

  • विराटला त्याच्या आईच्या हाताने बनवेलेली मटन बिर्याणी खूप आवडते.

  • विराटला क्रिकेटची इतकी आवड होती की, तो दिवसभर मैदानात सराव करायचा. फलंदाजी केल्यानंतर तो रिकाम्या वेळेत गोलंदाजी करायचा. शेवटी संध्याकाळी त्याला जबरदस्ती घरी पाठवावं लागायचं.

  • बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही विराट कोहलीची पहिली क्रश होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT