Virat kohli Birthday Record List Saam TV
Sports

King Kohli Birthday : क्रिकेटच्या किंग कोहलीचे ३४ 'विराट' विक्रम, जाणून घ्या...

विराट कोहली ३४ वर्षांचा झालाय. त्यानिमित्त त्याच्या नावावर असलेले ३४ विश्वविक्रम.

Nandkumar Joshi

Virat kohli Birthday Special Record : विराट कोहली... जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर विराट कोहलीनं मागे वळून पाहिलं नाही. आजच्या घडीला तो टीम इंडियाचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने १०२ कसोटी, २६२ वनडे आणि ११३ टी २० सामन्यांत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८,०७४ धावा आहेत. त्यात २७ शतके आणि २८ अर्धशतके आहेत. वनडेमध्ये त्याने ४३ शतके आणि ६४ अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या नावावर १२, ३४४ धावा आहेत. टी २० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३,९३२ धावा आहेत. यात त्याचा १ शतक आणि ३६ अर्धशतके आहेत.

५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेला कोहली आज ३४ वर्षांचा झाला आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्याचे ३४ विक्रम. (Cricket)

कोहलीच्या नावावर कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आहे. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध ९ शतके ठोकली आहेत.

टी २० मध्ये सर्वाधिक प्लेअर ऑफ द सीरीजचा पुरस्कार पटकावण्याचा विक्रमही कोहलीच्या नावे आहे. त्याने ७ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

विराट कोहलीने टी २० क्रिकेटमध्ये फलंदाजीतील सरासरी सर्वोत्कृष्ट आहे. त्याने ११३ सामन्यांत ५३.१३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

टी २० मध्ये सर्वाधिक अर्धशतके कोहलीने केली आहेत. त्याच्या नावावर ३६ अर्धशतके आहेत.

टी २० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३५०० धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने ९६ डावांत हा विक्रम केला आहे.

भारताने डिसेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम आहे. भारताने ३७२ धावांनी न्यूझीलंडला पराभूत करून इतिहास रचला होता.

सर्वात वेगवान ८ हजार, ९ हजार, १० हजार, ११ हजार, १२ हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे.

टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ३९३२ धावा केल्या आहेत.

टी २० मध्ये सर्वाधिक १५ वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे.

टी २० वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जास्त १०६५ धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे.

कोहली हा टी २० वर्ल्डकपमध्ये दोन वेळा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

कोहलीने वनडेत सर्वात वेगवान १० हजार धावा केल्या आहेत. २६२ सामन्यांत त्याने आतापर्यंत १२, ३४४ धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने एका कॅलेंडर वर्षात ११ डावांत १ हजार धावा केल्या आहेत. २०१८ मध्ये त्याने हा पराक्रम केला होता.

वनडे रँकिंगमध्ये सर्वाधिक ८९० रेटिंग पॉइंट मिळवणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

विस्फोटक फलंदाजांच्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये सर्वात जास्त ९२२ रेटिंग पॉइंट मिळवणारा खेळाडू.

कर्णधार म्हणून ९ वेळा १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम.

दोन संघांच्या विरोधात खेळताना सलग तीन शतके ठोकली.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० विजय मिळवून देणारा पहिला खेळाडू

२ बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार

किंग कोहलीची वनडे रेटिंग ९११ आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूची ही सर्वोत्कृष्ट रेटिंग आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम. कोहलीने चार शतकांसह ९७३ धावा केल्या आहेत.

२०१८ मध्ये कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा. कसोटीत १३ सामन्यांत १२२ धावा आणि १४ सामन्यांत १२०२ धावा.

टी २० वर्ल्डकपमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा. पाकिस्तानच्या विरोधात त्याने ३०८ धावा केल्या आहेत.

सर्वात वेगवान ३० आणि ३५ वनडे शतके ठोकण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १५ हजार आणि १७ हजार धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत २२ हजार धावा करण्याचा विक्रम. ४९३ डावांत हे यश संपादन केले आहे.

कोहली हा टी २० मध्ये एकूण १० हजार धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. आतापर्यंत ३५८ सामन्यांत ११, २५० धावा केल्या.

कर्णधार म्हणून सर्वाधिक ६ द्विशतके.

कर्णधार म्हणून सर्वात वेगवान ४ हजार कसोटी धावा. ६५ डावांमध्ये ही किमया

किंग कोहली सर्वाधिक वेगवान वनडे शतक ठोकणारा भारतीय खेळाडू. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२ चेंडूंत शतक ठोकलं होतं.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोहलीच्या नावे. त्याने आतापर्यंत ६४११ धावा केल्या आहेत.

टी २० वर्ल्डकपमध्ये फलंदाजीची सरासरी ८० पेक्षा जास्त आहे.

कोहली सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरलाय. कर्णधार म्हणून त्याने ४० कसोटी सामने जिंकले आहेत.

कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा पहिला आशियाई. त्याचे २२१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Bhurka Recipe: जेवताना तोंडी लावायला बनवा झणझणीत लसणाचा भुरका

Maharashtra Live News Update फलटण आत्महत्या प्रकरणात फडणवीसांचे SIT गठित करण्याचे आदेश

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी शरद पवारांचीच; मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

PM Narendra Modi : आजारातून लवकर बरे व्हा; संजय राऊतांची प्रकृती गंभीर, PM नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट

French fries Recipe : घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत फ्रेंच फ्राइज, एक घास खाताच महागड्या हॉटेलची चव विसराल

SCROLL FOR NEXT