मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जागतिक स्तरावर दिग्गज खेळाडू असल्याचं सर्वश्रूत आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून कोहलीच्या (Virat Kohli) बॅटमधून क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पडत नव्हता. परंतु, आशिया कपमध्ये कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध 'विराट' खेळी करून टी-२० तील पहिले शतक ठोकले. एकीकडे क्रिकेटच्या मैदानात विराटचा बोलबाला असतानाच आता सोशल मीडियावरही (social media) तो चमकला आहे.
कोहलीच्या ट्विटर हॅंडलवर (twitter) तब्बल पाच कोंटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे ट्विटरवर पाच कोटीहून अधिक फॉलोअर्स मिळवणारा विराट कोहली पहिला क्रिकेटर बनला आहे. कोहलीला इन्स्टाग्राम (Instagram) आणि ट्विटरवरच्या एका पोस्टमुळं कोट्यावधी रुपयांची कमाई होते. (Virat Kohli income on social media)
विराट कोहलीचे इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील कोट्यावधी फॉलोअर्स पाहिल्यावर चाहत्यांना त्याच्या सोशल मीडियावरील कमाईबाबत अनेकदा प्रश्न पडला असेल. कोहली सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कोट्यावधी रुपयांची कमाई करतो. ही कमाई प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी असते.
ट्विटरशिवाय विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर २११ मिलियन (२१.१ कोटी) फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर कोहलीला ४९ मिलियन (४.९०) कोटीहून अधिक लोकं फॉलो करतात. त्यामुळे विराटची तीन प्लॅटफॉर्मवरील ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे एकूण फॉलोअर्स ३१० मिलियन म्हणजेच ३१ कोटी एवढे होतात.
हूपर २०२२ इन्स्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराट कोहलीची इन्स्टाग्रामवर कोट्यावधी रूपयांची कमाई होते. कोहली इन्स्टाग्रामवर एक स्पॉन्सर्ड पोस्ट शेअर करतो. या पोस्टमुळं त्याला १,०८८,००० डॉलर (जवळपास ८.६९ कोटी रूपये) एवढी कमाई होते. म्हणजेच कोहली एका पोस्टमुळं करोडपती होतो. भारतात इन्स्टाग्रामवरून सर्वात जास्त पैसे कमावण्यात विराट कोहली अग्रस्थानी आहे. जगभरातील सेलिब्रिटींबाबत बोलायचा झालं तर कोहली १४ व्या स्थानी आहे. या लिस्टमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर आहे.
ट्विटरवर फॉलोअर्स वाढण्यासाठी लोकं खूप काही करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कोहली इथंही स्टार बनला असून तो कोट्यावधी रुपये कमावत आहे. याबाबत २०२२ मध्ये एक रिपोर्ट समोर आला होता. यामध्ये खुलासा करण्यात आला होता की, कोहली ट्विटरवर एका पोस्टच्या माध्यमातून ३५०,१०१ डॉलर (जवळपास २.५ कोटी रूपये) कमावतो. तेव्हा त्याचे फॉलोअर्स ३४ मिलियन (३.४ कोटी) होते. आता फॉलोअर्स ५ कोटीहून अधिक झाले आहेत.त्यामुळे त्याची कमाई दुपटीने वाढली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.