T 20 World Cup Team India Playing XI | मुंबई: टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झालेली आहे. सोमवारी भारताने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सर्वात भरवशाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि दीपक चाहरला राखीव ठेवण्यात आले आहे. यावरून क्रिकेट चाहते प्रचंड नाराज असल्याचे प्रतिक्रियांमधून दिसून आले.
दुसरीकडे संजू सॅमसनलाही संधी मिळाली नाही. इशान किशनलाही संघाबाहेर ठेवण्यात आले. आता ज्या खेळाडूंना १५ जणांमध्ये स्थान देण्यात आले आहे, त्यापैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळं आशिया कपमधून बाहेर झाला. आता टीम इंडियामधील (Team India) बॅलन्स आधीसारखा राहिला नाही. बॅलन्स ठेवण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. आशिया कपमध्ये महत्वाच्या सामन्यांमध्ये कर्णधार आणि हेड कोचकडून काही चुका झाल्या असतील. ते केवळ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरले. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
परिणामी भारतीय संघाला फायनलमध्ये स्थान मिळालं नाही. आता उत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणे हेच टीम व्यवस्थापनासाठी महत्वाचे असेल.
उथप्पाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषभ पंत नाहीच
टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची (Team India Squad) घोषणा झाली असली तरी, भारताच्या दिग्गज खेळाडूंनीही आपापल्या परीने प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. चेतेश्वर पुजारा आणि रॉबिन उथप्पा यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असेल हे सांगितले आहे. उथप्पाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषभ पंतला स्थान देण्यात आलेले नाही. तर पुजाराने पंत आणि कार्तिक या दोघांना स्थान दिले आहे.
रॉबिन उथप्पाची प्लेइंग इलेव्हन
के. एल. राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल
चेतेश्वर पुजाराची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.
आता रोहित शर्मा (Rohit Sharma) कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवेल हे जाणून घेणे महत्वाचे आहे. दीपक हुड्डा याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार आणि गोलंदाजी करण्याची संधी देणार का, हा देखील प्रश्न आहे. आशिया कपमध्ये दीपक हुड्डाला संधी दिली नव्हती. आता टीम इंडियाची पुढची रणनीती कशी असेल, हे पाहावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.