T20 World Cup | मुंबई: ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महामेळा टी- २० वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. दुखापतीमुळं आशिया चषक स्पर्धा न खेळणारे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे संघात पुनरागमन झालेले आहे. याशिवाय टीम इंडियात आशिया चषक स्पर्धा खेळलेले अनेक खेळाडू आहेत.
भारताचा (Team India) अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांना राखीव म्हणून संघात स्थान देण्यात आलेले आहे. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात स्थान देण्यात आलेले आहे. मात्र, विराट कोहलीची टीम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमपेक्षा वेगळी आहे. मागील टी २० वर्ल्डकप स्पर्धेत संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर टीममध्ये यावेळी बदल करण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांत कर्णधार रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी अनेक प्रयोग केले आहेत. मात्र, मागील टी २० वर्ल्डकपमधील संघापेक्षा आगामी वर्ल्डकप स्पर्धेतील संघात झालेली पाच खेळाडूंची निवड वेगळी ठरली आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळं सध्याच्या संघात नाही. त्याच्या जागी अक्षर पटेल याचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळच्या संघातून ईशान किशन, मोहम्मद शमी, राहुल चाहर, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे. तर दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांना स्थान देण्यात आले आहे.
आवेश आणि बिश्नोई यांची संधी हुकली आहे. बुमराह आणि हर्षल पटेल यांचे संघात पुनरागमन झाल्याने आवेश खान आणि रवी बिश्नोई यांना संधी मिळू शकली नाही. बिश्नोईच्या जागी रवीचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आले आहे. तर बिश्नोईने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करूनही त्याला टी २० वर्ल्डकप संघात राखीव ठेवण्यात आले आहे.
दिनेश कार्तिकवर टीम व्यवस्थापनाने भरवसा कायम ठेवला आहे. एकेकाळी संघाबाहेर झालेल्या दिनेश कार्तिकने संघात स्थान मिळवले आहे. दुसरीकडे रिषभ पंतही संघात आहे. त्यामुळे फिनिशर म्हणून कार्तिकचा वापर कसा केला जातो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. रवींद्र जडेजा हा डावखुरा फलंदाज होता. त्याच्यानंतर रिषभ पंत हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. त्यामुळे त्याची दावेदारी अधिक मजबूत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.