भारत-पाकिस्तान सामन्यात आफ्रिदीच्या मुलीने फडकावला तिरंगा; शाहीद आफ्रिदी म्हणाला...

शाहीद आफ्रिदीच्या लेकीने मैदानात तिरंगा फडकवला होता. त्याच्या मुलीचा तिरंगा फडकावताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर शाहीद आफ्रिदीने भाष्य केलं आहे.
shahid afridi News
shahid afridi News saam tv
Published On

shahid afridi News : आशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला काही खास प्रदर्शन करता आलं नाही. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली होती. मात्र, सुपर ४ मध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. याच सामन्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी वादात अडकला आहे. शाहीद आफ्रिदीच्या लेकीने मैदानात तिरंगा फडकवला होता. त्याच्या मुलीचा तिरंगा फडकावताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर शाहीद आफ्रिदीने भाष्य केलं आहे.

shahid afridi News
Babar Azam Tweet : पाकिस्तानचा पराभव, पण बाबर आझमचं विराटसाठी पोस्ट केलेलं जुनं ट्विट होतंय व्हायरल

शाहीद आफ्रिदीने एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलमध्ये संवाद साधताना मुलीने तिरंगा हाती का घेतला ? याबाबत मोठा खुलासा केला आहे.'भारत-पाक सामन्याबाबत दोन्ही संघाच्या चाहत्यांना उत्सुकता होती. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे चाहते मोठ्या प्रमाणात होते. मैदानात ९० टक्के चाहते हे भारतीय क्रिकेट संघाचे होते. मैदानात पाकिस्तानचा झेंडा नव्हता. त्यामुळे माझ्या मुलीने हातात भारतीय झेंडा घेतला'.

shahid afridi News
T-20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

पाकिस्तानने केला होता भारताचा पराभव

पाकिस्तानचा क्रिकेट संघाने पाच गडी गमावून भारतावर मात केली होती. सुपर ४ मध्ये भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाजने जोरदार फलंदाजी करत पाकिस्तान संघाला जिंकवून दिले. या सामन्यात अर्शदीपने झेल सोडल्यानंतर १९ व्या षटकात भुवनेश्वरने १९ धावा दिल्या. त्यामुळे भारताची सामना जिंकण्याची आशा मावळली. सुपर ४ च्या या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com