Virat Kohli : पाकिस्तान विरुद्ध कोहली पाडतो धावांचा पाऊस, टी20 मध्ये 'विराट' आकडेवारी

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली धावांसाठी संघर्ष करत होता, पण....
Virat Kohli
Virat Kohli saam tv

मुंबई : मागील दोन-तीन वर्षांपासून क्रिकेटची रनमशीन समजला जाणारा भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली धवांसाठी संघर्ष करत होता. खराब फॉर्ममुळं तो अनेकदा ट्रोलही झाला. एव्हढच नाही तर जगातील महान फंलदाजांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विराटवर प्लेईंग 11 बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

पण मागील काही महिन्यांपासून विराटने (Virat kohli) चमकदार कामगिरी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. चेज मास्टर विराटने टी20 वर्ल्डकपमध्ये आज झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभूतपूर्व खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 53 चेंडूत 82 धावा कुटून विराटने पाकिस्तान विरुद्ध भारताला ऐतिहासिक विजय संपादन करून दिला. (virat kohli outstanding batting against pakistan cricket team)

virat Kohli
virat Kohlisaam tv

पाकिस्तान विरुद्ध विराटचा जबरदस्त रेकॉर्ड

पाकिस्तान विरोधात झालेल्या लढतीत विराट कोहलीने आक्रमक खेळी केली आहे. पाकिस्तान विरुद्ध विराटचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. विराट कोहलीनं (virat Kohli) त्यांच्या विरुद्ध 7 टी20 सामन्यात 77.75 च्या सरासरीनं 311 धावा कुटल्या आहेत. अशातच आज झालेल्या सामन्यातही विराटने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. 53 चेंडूत विरटाने 82 धावांची नाबाद खेळी करून भारताला विजय संपादन करून दिला. सावध खेळी करून नंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमकपणे खेळी करणाऱ्या विराटने या इनिंगमध्ये सहा चौकार आणि चार षटकार लगावले.

Virat Kohli
IND VS PAK T20 LIVE : आश्विननं केलं विन, 'विराट' खेळीमुळं भारताचं 'हार्दिक' अभिनंदन, पाकिस्तानचा पराभव

पाकिस्तान विरुद्ध टी20 मध्ये तीन अर्धशतक

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या टी20 टुर्नामेंटमध्ये विराट कोहलीच्या नावावर तीन अर्धशतक आहेत. मागील काही वर्षांमध्ये विराट अपेक्षेप्रमाणे फॉर्मात नव्हता. परंतु, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला माहितेय की, विराट कोहली पाकिस्तानसाठी किती धोकादायक फलंदाज ठरू शकतो आणि आजच्या सामन्यातही कोहलीनं सिद्ध करून दाखवलं.

Virat Kohli
IND VS PAK T20 : रनमशीनच! भारतासाठी कोहलीची पुन्हा एकदा 'विराट' खेळी

आशिया कपमध्येही कोहलीची चौफेर फटकेबाजी

आशिया कपमध्ये विराट कोहलीनं नेहमीच चमकदार कामगिरी केलीय. आशिया कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये विराटने मैदानात धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने 76.50 च्या जबरदस्त सरासरीनं 153 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची 56 धावांची खेळी सर्वाधिक आहे. तसंच पाकिस्तान विरुद्ध कोहलीनं वनडे क्रिकेट करिअरमध्ये सर्वाधिक 183 धावा केल्या आहेत आणि ही दमदार कामगिरी त्याने आशिया कपमध्येच केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com