पाकिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नवाझचा बाराव्या षटकात विराट कोहली आणि पंड्याने धुव्वा उडवला. तीन षटकार ठोकून वीस धावांची खेळी भारतीय फंलदाजांनी केली. त्यामुळं अठराव्या षटकानंतर भारताची धावसंख्या चार बाद 131 वर पोहोचली आहे. विराट-हार्दिकची सावध खेळी केली. 19 षटकानंतर भारताची धावसंख्या 144-5 अशी होती. त्यानंतर विराटने षटकार मारून आक्रमक खेळी करत भारतला विजय मिळवून दिला. विराट कोहलीनं पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत 53 चेंडूत 82 धावांची नाबाद आक्रमक खेळी केली. या इनिंगमध्ये विराटने सहा चौकार आणि चार षटकार ठोकले.
A fine half-century from Virat Kohli 👏
— ICC (@ICC) October 23, 2022
Can he take India home? 👀#T20WorldCup | #INDvPAK | 📝 https://t.co/H9EE5QNfGD pic.twitter.com/DtRzm5Mjvv
भारताचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादवही हारिसच्या गोलंदाजीचा शिकार झाला. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये भारताची सुरुवात खराब झाली. त्यामुळं सहा षटकानंतर भारताची धावसंख्या 31-3 अशी झाली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला अक्षर पटेल शादाब खानच्या षटकात धावबाद झाला. अकरा षटकानंतर भारताची धावसंख्या 60-4 अशी झाली आहे. सहाव्या षटकानंतर भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पंड्या कमान सांभाळत आहेत.
पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहने भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहुलला चार धावांवर बाद केलं. त्यानंतर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा भारताची कमान सांभाळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पाच षटकानंतर भारताची धावसंख्या 22-2 अशी झाली आहे. पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफने रोहित शर्माला चार धावांवर झेलबाद केलं. त्यानंतर भारताचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादवही हारिसच्या गोलंदाजीचा शिकार झाला. त्यामुळे पॉवर प्ले मध्ये भारताची सुरुवात खराब झाली. त्यामुळं सहा षटकानंतर भारताची धावसंख्या 31-3 अशी झाली आहे.
भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला सुरु असून टी20 वर्ल्डकपमधील या सामन्यात पाकिस्तानने भारताला 160 धावांचं आव्हान दिलं आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानात उतरला आहे. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या 5-0 अशी आहे.
हार्दिक पंड्याने चौदाव्या षटकात कमाल केली. पाकिस्तानचे फंलदाज शादाब खान आणि हैदर अलीला झेलबाद केलं. सूर्यकुमार यादवे दोन्ही फंलदाजांचा झेल घेतला. पण त्यानंंतर सोळाव्या षटकातही हार्दिकने विकेट्स घेण्याचा सिलसीला सुरुच ठेवला. मोहम्मद नवाझला हार्दिकने 9 धावांवर बाद केलं. मात्र, फंलदाज शान मसूदने पाकिस्तानची शान राखली. त्यामुळे 18 व्या षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 135-7 अशी झाली. शान मसूदच्या अर्धशतकाच्या जोरावर 19 व्या षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 149-7 अशी आहे. विसाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने शाहिन आफ्रिदीला 16 धावांवर बाद केलं. पाकिस्तानच्या शान मसूदने 42 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली. त्यामुळं वीस षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 159-8 वर पोहोचली.
मोहम्मद शमीनं 13 व्या षटकात आक्रमक फलंदाज इफ्तिखार अहमदला 51 धावांवर बाद केलं. चार षटकार ठोकणाऱ्या अहमदला शमीनं झेलबाद करून पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळं पाकिस्तानची 13 व्या षटकानंतर 96-3 अशी झाली. त्यानंतर 14 व्या षटकात हार्दिक पंड्याने शादाब खानला पाच धावांवर झेलबाद केलं.
रविचंद्रन आश्विनने अकरावे षटक टाकलं. आतापर्यंत टाकलेल्या दोन षटकात आश्विनने 15 धावा दिल्या.
हार्दिकने दहाव्या षटकातही चागंली गोलंदाजी केली. पाकिस्तानचे फलंदाज शान मसूद आणि इफ्तिखार अहमदला मोठे फटके मारू दिले नाही. त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या 60 चेंडूनंतर 60 वरच राहिली.
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने पाकिस्तानचे फलंदाज शान मसूद आणि इफ्तिखार अहमदला आक्रमक फटकेबाजी करु दिली नाही. आश्विनने भेदक गोलंदाजी करत 9 व्या षटकात अवघ्या पाच धावा दिल्या.
मोहम्मद शमीनं आठव्या षटकात सटीक गोलंदाजी केली. पाकिस्तानचा शान मसूद झेलबाद होतो होता वाचला. रविचंद्रन आश्विननं अप्रतिम फिल्डिंग केली. पहिल्या षटकात बाबर आझमला पव्हेलियनचा रस्ता दाखवणारा भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग दुसऱ्या षटकातही चमकला. अर्शदीपने जबरदस्त बाऊंसर चेंडू फेकून मोहम्मद रिझवानला चार धावांवर झेलबाद केलं.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिकने सातव्या षटकात पाकिस्तानच्या फंलदाजांची दमछाक केली. या षटकात त्याने 9 धावा दिल्या. पण पाकिस्तानचा फंलदाजाला बाद करण्यासाठी त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली.
पॉवर प्ले मधील शेवटचं षटक स्टार गोलंदाज मोहम्मद शमीनं टाकलं. या षटकात त्याने 8 धावा दिल्या. दरम्यान, पॉवर प्ले मध्ये पाकिस्तानने दोन विकेट्स गमावल्या. पहिल्या षटकात बाबर आझमला पव्हेलियनचा रस्ता दाखवणारा भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग दुसऱ्या षटकातही चमकला. अर्शदीपने जबरदस्त बाऊंसर चेंडू फेकून मोहम्मद रिझवानला चार धावांवर झेलबाद केलं. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था सहा षटकानंतर 32-2 अशी होती.
भुवनेश्वर कुमारने पाचव्या षटकासाठी गोलंदाजी केली. भुवनेश्वरने तीन षटकात 14 धावा दिल्या. पहिल्या षटकात बाबर आझमला पव्हेलियनचा रस्ता दाखवणारा भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग दुसऱ्या षटकातही चमकला. अर्शदीपने जबरदस्त बाऊंसर चेंडू फेकून मोहम्मद रिझवानला चार धावांवर झेलबाद केलं.
पहिल्या षटकात बाबर आझमला पव्हेलियनचा रस्ता दाखवणारा भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग दुसऱ्या षटकातही चमकला. अर्शदीपने जबरदस्त बाऊंसर चेंडू फेकून मोहम्मद रिझवानला चार धावांवर झेलबाद केलं.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं तिसऱ्या षटकातही अप्रतिम गोलंदाजी केली. बाबर आझम बाद झाल्यानंतर दबावात असलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाही. त्यामुळे तीन षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 10-1 अशी आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना आक्रमक खेळी करता आली नाही. एका वाईडमुळं पाकिस्तानची धावसंख्या पहिल्या षटकात 1-0 अशी होती. परंतु, दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केलं.
भारताने नाणेफेक जिंकली असून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर 12 ग्रुपमधील हा सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये चाहत्यांचा जल्लोष सुरु आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याचा थ्रीलर थोड्याच वेळात सुरु होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आजचा सामना कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🚨 Toss Update & Team News from MCG 🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl against Pakistan. #T20WorldCup | #INDvPAK
— BCCI (@BCCI) October 23, 2022
Follow the match ▶️ https://t.co/mc9useyHwY
Here's our Playing XI 🔽 pic.twitter.com/1zahkeipvm
टी20 वर्ल्डकप 2022 चा थरार सुरु झाला असून आज भारत-पाकिस्तान यांच्यात मेलबर्नच्या मैदानात महामुकाबला होणार आहे. या सामन्याची संपूर्ण क्रिडा विश्वाला प्रतीक्षा लागली होती. कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाची पलटण घेऊन पाकिस्तान विरोधात मैदानात उतरणार आहे. मेलबर्नमध्ये ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. परंतु, मैदानात अद्यापही पावसाने हजेरी लावली नसल्याने क्रिकेट चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.