viratk kohli twitter
Sports

Virat Kohli: किंग कोहलीचा दरारा..कालपण आणि आजपण! विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण

Virat Kohli 16 Years In Cricket: भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीची आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्ष पूर्ण केली आहेत. वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेट गाजवणाऱ्या विराट कोहलीने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहली हा क्रिकेटमधील किंग म्हणून ओळखला जातो.

वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकरसारखे फलंदाज संघात असताना, विराटने भारतीय संघात स्थान मिळवलं. भारतीय संघाला अंडर १९ वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर विराट कोहलीची भारतीय संघात एन्ट्री झाली होती.

त्याची फलंदाजी आणि आक्रमकता पाहून त्याला भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून पाहिलं जाऊ लागलं होतं. सुरुवातीला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विराटला धोनीनंतर भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने परदेशात जाऊन मालिका जिंकल्या. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान गाठलं.

अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेतून सुरुवात

अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेने भारतीय संघाला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विराट कोहली. २००८ मध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची जबाबदारी विराट कोहलीकडे सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती.

त्यानंतर त्याला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आजच्याच दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट २००९ त्याला भारतीय संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली.

विराटने २००९ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर २०१० मध्ये त्याला टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. हे दोन्ही फॉरमॅट गाजवल्यानंतर त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

टी-२० क्रिकेटला रामराम

विराट कोहलीने भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. संपूर्ण स्पर्धेत तो फ्लॉप ठरला. मात्र फायनलमध्ये इतर फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर विराट चमकला. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली आणि भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. दरम्यान भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावल्यानंतर विराटने ट -२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २९५ वनड, ११३ कसोटी आणि १२५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ८८४८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २९ शतकं आणि ३० अर्धशतकं झळकावली आहेत.

तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १३९०६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५० शतकं आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४१८८ धावा केल्या. यादरम्यान त्याला १ शतक आणि ३८ अर्धशतकं झळकावता आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT