Jay Shah On Womens T20 World Cup 2024: बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचे आयोजन बांगलादेशमध्ये केले जाणार होते. मात्र तणावपूर्ण वातावरण असताना ही स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित होणं जरा कठीण दिसून येत आहे.
त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरु होती. मात्र बीसीसीआयने स्पष्ट नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला अधिक प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, जय शहा म्हणाले की,' त्यांनी( ICC) आम्हाला महिला टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबाबत विचारले असता, मी स्पष्ट नकार दिला आहे. भारतात सध्या मान्सून आहे. यासह पुढच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे सलग वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्याचे मी कुठलेही संकेत देणार नाही.' असं जय शहा म्हणाले.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. १९ सप्टेंबरपासून हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेबाबत बोलताना जय शहा म्हणाले की,' आम्ही त्यांच्याशी अजूनपर्यंत काहीच चर्चा केलेली नाही. तिकडे नवीन सरकार स्थापन झालं आहे. ते आमच्याशी संपर्क करु शकतात किंवा मग आम्ही त्यांच्याशी संपर्क करु. बांगलादेशविरुद्ध होणारी कसोटी मालिका ही आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.'
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने बांगलादेशविरुद्ध होणारी कसोटी मालिका ही भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. दोन्ही संघ २ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.
हा सामना बंगळुरुतील एमए चिंदबरम स्टेडियमवर रंगणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान रंगणार आहे. त्यानंतर टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील ३ सामने अनुक्रमे ६,९ आणि १२ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.