Bangladesh Crisis : बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य करणारी जमात-ए-इस्लामी म्हणजे काय? का उफाळला हिंसाचार

Bangladesh Crisis Update/ Jamaat-e-Islami : बांगलादेशातील आरक्षणाविरोधातील हिंसक निदर्शनांमागे इस्लामिक गट असलेल्या जमात-ए-इस्लामी या संघटनेचं नाव समोर येत आहे.
Bangladesh Riot: बांगलादेशात अराजकता, ठीक-ठिकाणी घरांची जाळपोळ
Bangladesh Riot
Published On

शेजारील देश अर्थातच बांगलादेशात आरक्षणाच्या आंदोलनातील हिंसाचाराचा खेळ अखेर सत्तापालटाच्या पातळीवर पोहोचला. ढाकासह बांगलादेशातील सर्व जिल्ह्यांमधील शहरे आणि गावांमध्ये हिंसाचाराचे उफाळून आला आहे. अल्पसंख्याक हिंदूंच्या घरांमध्ये आणि कार्यालये, मंदिरांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि लुटमारीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. .

Bangladesh Riot: बांगलादेशात अराजकता, ठीक-ठिकाणी घरांची जाळपोळ
Ration On ATM : रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार, ATM वर मिळणार रेशन

बांगलादेशातील आरक्षणाविरोधातील हिंसक निदर्शने ते सत्तापालट आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनामा आणि हद्दपारीपासून ते पुतळा फोडण्यापर्यंतच्या अनेक घटनांमागे कट्टरपंथी इस्लामिक गट असलेल्या जमात-ए-इस्लामीचे नाव समोर येत आहे. बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे नाव मुख्यत्वे घेतले जात आहे. पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या या अनियंत्रित संघटनेवर अवामी लीग सरकारने बंदी देखिल घातली होती. मात्र जमात-ए-इस्लामी म्हणजे नेमके काय?

राजकीय कोलाहलाच्या आवरणाखाली मिळालेल्या संधीचा फायदा घेत कट्टरपंथी इस्लामिक शक्तींनी संपूर्ण बांगलादेशला पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत ढकलण्याचा कट रचला आहे. बांगलादेशची राजधानी ढाकासह सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या घरे, कार्यालये, दुकाने, मंदिरे आणि शाळांवर हल्ले, जाळपोळ, लूटमार, तोडफोड आणि महिलांवर बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहेत. चला, जाणून घेऊया जमात-ए-इस्लामी आणि तिची विचारसरणी.

जमात-ए-इस्लामी ही कट्टरवादी इस्लामिक संघटना हिंदूंना लक्ष्य करते. ही संघटना बांगलादेशातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे आणि तिचे सदस्य हिंदूंवरील हिंसाचारात सहभागी आहेत. जमात-ए-इस्लामीची स्थापना 1941 मध्ये झाली आणि बांगलादेशमध्ये इस्लामिक शासन स्थापन करण्याचे उद्दिष्ट या संघटनेचे आहे. ही संघटना हिंदूंना काफिर मानते आणि त्यांची बांगलादेशातून हकालपट्टी करण्याची मागणी करते.

Bangladesh Riot: बांगलादेशात अराजकता, ठीक-ठिकाणी घरांची जाळपोळ
Rajasthan Crime News : पत्नीला दुचाकीला बांधून पतीने गावभर फरफटत नेलं; कारण ऐकून तळपायाची आग जाईल मस्तकात

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना सध्या वाढत आहेत. हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर हल्ले केले जात आहेत आणि हिंदूंना मारहाण केली जात आहे. अनेक हिंदू कुटुंबांना आपली घरे सोडावी लागली आहेत.कट्टरतावादी शक्तींनी हिंसाचार भडकावून हिंदूंना लक्ष्य केले आहे. या शक्तींना बांगलादेशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करून हिंदूंना त्यांच्या मार्गातून दूर करायचे आहे.

बांगलादेश सरकारने हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांचा निषेध केला आहे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु अद्याप काही कठोर कारवाई केली गेली नाही आणि हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना ही बांगलादेशातील गंभीर समस्या आहे. ही समस्या केवळ हिंदूंची नाही, तर संपूर्ण बांगलादेशची आहे. हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना थांबवण्यासाठी बांगलादेश सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी अनेक स्तरांमधुन केली जात आहे.

जमात-ए-इस्लामी नेहमीच बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले करत आली आहे. बांगलादेशात राहणारे हिंदू हे नेहमीच कट्टरतावादी जमात-ए-इस्लामी पक्षाचे लक्ष्य राहिले आहेत. जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांवर अल्पसंख्याक हिंदूंविरुद्धच्या हिंसक घटनांबद्दल गंभीर गुन्हे दाखल आहेत. मानवाधिकाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, जमात-ए-इस्लामी आणि त्याचा छत्र इस्लामी शिबीर बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित आणि मालमत्तेला सातत्याने नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत राहीले आहेत.

बांगलादेशातील स्वयंसेवी संस्थांच्या अलीकडील आकडेवारीनुसार, 2013 ते 2022 पर्यंत बांगलादेशात हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले झाले आहेत. यापैकी बहुतांश हल्ल्यांमध्ये जमात-ए-इस्लामीने मोठी भूमिका बजावली आहे. भारत आणि रशियासह जगातील अनेक देशांमध्ये जमात-ए-इस्लामीवर बंदी आहे, परंतु ही संघटना आपले नाव बदलून किंवा टोपणनाव वापरून आपल्या जातीय हेतूंना प्रोत्साहन देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com