vinesh phogat twitter
Sports

Vinesh Phogat Family Reaction: 'यात सरकारचाच हात..' विनेश फोगाट अपात्र ठरताच कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Vinesh Phogat Disqualification: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र ठरली आहे. दरम्यान अपात्र ठरताच तिच्या कुटुंबियांनी आरोप केले आहेत.

Ankush Dhavre

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी (६ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. तिने ५० किलोग्रॅम वजनी गटात जगातील नंबर १ पैलवानाला हरवत फायनल गाठली. मात्र फायनलच्या दिवशी कोट्यावधी भारतीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. विनेशचं वजन ५० किलोग्रॅमपेक्षा १०० ग्रॅमने अधिक असल्याने ती फायनल सामन्यातून अपात्र ठरली आहे. दरम्यान विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर तिचे सासरे म्हणाले की, ' १०० ग्रॅम वजन वाढणं खूप नसतं. डोक्यावरील केसांमुळेही १०० ग्रॅम वजन वाढतं.' यामागे सरकार आणि बृजभूषण सिंग यांचा हात असल्याचाही आरोप तिच्या सासऱ्यांनी केला आहे. ' ही खूप धक्कादायक बातमी असून राजकारण केलं जात आहे.१०० ग्रॅम वजन वाढल्याने कोण बाहेर काढतं? सपोर्ट स्टाफनेही कुठलीही मदत केलेली नाही.' असा आरोप तिच्या सासऱ्यांनी केला आहे.

विनेश विरोधात कट रचला जातोय

' माझ्या विरोधात कट रचला जात असल्याचं विनेशने अनेकदा सांगितलं. तिने जयपूरला असतानाही असं वक्तव्य केलं होतं. माझं आणि तिचं अद्यापही बोलणं झालेलं नाही.' असं तिचे सासरे म्हणाले.

फायनलमध्ये पोहोचणारी पहिली महिला कुस्तीपटू

विनेश फोगाटने फायनलमध्ये प्रवेश करत इतिहास रचला होता. ती महिलांच्या कुस्ती प्रकारात ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली होती. तिने एकाच दिवशी ३ खेळाडूंना पराभूत करत फायनलमध्ये जाण्याची किमया साधली. तिने प्री क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड नंबर १ खेळाडूला चितपट केलं होतं. तिने युवी सुसाकीचा ३-२ ने पराभव केला. त्यानंतर पुढील फेरीत युक्रेनच्या ओक्सानाला ७-५ ने धूळ चारली. सेमी फायनलच्या सामन्यात तिने गुझमन लोपेझचा ५-० ने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT