Vinesh Phogat Saam Tv
Sports

Vinesh Phogat: विनेश फोगाटचं कमबॅक! निवृत्तीचा निर्णय मागे; २०२८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळणार

Vinesh Phogat Annoucement to Play In Olympics 2028: विनेश फोगाटने पुन्हा एकदा कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ती खेळणार आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिने ही माहिती दिली आहे.

Siddhi Hande

विनेश फोगाटचं कमबॅक

२०२८ ऑलिम्पिकसाठी सज्ज

सोशल मीडिया पोस्ट करत केली घोषणा

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, तिने हा निर्णय मागे घेतला आहे. ती पुन्हा एकदा मैदानात खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही अपडेट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने म्हटलंय की, तिचं लक्ष आता लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या २०२८ मधील ऑलिम्पिक खेळावर आहे.

विनेश फोगाटने केली कमबॅकची घोषणा (Vinesh Phogat to Play in Olympic 2028)

विनेश फोगाटने पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटलंय की, लोक मला अनेकदा विचारतात. त्यांची शेवटची पॅरिस ट्रीप शेवटची होती का? माझ्याकडे याचं उत्तर नव्हते. मला मॅट, अपेक्षा आणि स्वप्नांपासून दूर जायचे होते. इतक्या वर्षातून मी पहिल्यांदा सुटकेचा निःश्वास सोडला. माझे काम, जीवनातील चढ-उतार, त्याग आणि माझे पैलू समजून घेण्यासाठी वेळ लागला. मला अजूनही खेळ आवडतो. मला अजूनही स्पर्धा करायची आहे.

शांततेने मला खूप काही शिकवले, आग कधीच विझत नाही. फक्त थकवा आणि आवाजाखाली दबले गेले होते. शिस्त, दिनचर्या आणि स्पर्धा हे माझ्या शरीरात आहे. मी कितीही दूर गेले तर माझा एक भाग हा मॅटवर असतो. त्यामुळे मी येथे आहे. आता मी LA28 च्या दिशेने परत पाऊल टाकत आहे. यावेळी मी एकटी नव्हे तर माझा मुलगादेखील संघात सामील होत आहे, असं तिने पोस्टमध्ये लिहलंय.

विनश फोगाटचं अर्धवट राहिलेलं स्वप्न

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकण्याचे विनेश फोगाटचे स्वप्न होते. मात्र, तिचे स्वप्न अर्धवट राहिले. तिला जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. यामुळे देशासाठी गोल्ड मेडल मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. परंतु आता विनेश फोगाटने पुन्हा एकदा जिद्दीने कमबॅक केलं आहे. ती पुढच्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC केली तरी मिळणार नाहीत ₹ १५००;कारण काय? वाचा सविस्तर

तुमच्या ताटातील मासे गायब होणार? समुद्राचं पाणी होतंय विषारी

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी घरगुती हे सीरम करा ट्राय, आठवड्याभरात दिसेल फरक

गृहयुद्धामुळे हाहाकार, रुग्णालयात एअर स्ट्राईक 30 जणांचा मृत्यू, 70 जखमी

SCROLL FOR NEXT