Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Vinesh Phogat Criticized BJP: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट यांची पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
Vinesh Phogat
Vinesh Phogat Criticized BJPSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून 'एक है तो सेफ है' हा नारा सातत्याने दिला जात आहे. आता यावर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू तसेच काँग्रेस पक्षाच्या आमदार विनेश फोगाट यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'भाजपकडून एक है तो सेफ है हा नारा दिला जात आहे. पण आम्ही तेव्हा सेफ राहू जेव्हा यांच्या नेत्यांकडून महिलांवर होणारे अत्याचार हे थांबविले जाईल.', असा टोला विनेश फोगाटने भाजपला लगावला आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट यांची पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, 'यांनी महिलांसाठी योजना आणली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटरच्या बाहेर जेव्हा महिला आंदोलन करत असतात तेव्हा महिलांच्या प्रती त्यांचा असलेला आदर का दिसत नाही?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, 'जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हाच त्यांचं महिलांच्या प्रती आदर तसंच प्रेम हे दिसून येतो.', असं मत त्यांनी व्यक्त केले.

Vinesh Phogat
Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

तसंच, 'महायुतीकडे राज्यात जातीपातीमध्ये वाटण्याचं काम केलं गेलं आहे. राज्यात या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी गेले असता तिथं नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज भाजपच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला देशद्रोही बनविण्यात आलं आहे. मला देखील देशद्रोही बनवलं गेलं. कारण आम्ही त्यांच्या नेत्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्यात द्वेष पसरवण्याचे काम या भाजपने केलं असून येत्या २० तारखेला मतदानातून त्यांना धडा शिकवत आम्हाला आशीर्वाद द्या आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही नक्कीच इथली संस्कृती जपू.', असं आवाहन यावेळी विनेश फोगाट यांनी केले.

Vinesh Phogat
Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com