Shruti Vilas Kadam
अनन्या पांडेने आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड ‘Chanel’ साठी भारतातील पहिली ब्रँड अॅम्बेसेडर बनून इतिहास रचला आहे. चॅनेलची अॅम्बेसेडर होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली.
‘Chanel Spring-Summer 2026 Ready-to-Wear’ या शोमध्ये अनन्याने पॅरिस फॅशन वीकमध्ये ग्लॅमरस एंट्री घेतली. तिच्या एलिगंट आणि सॉफिस्टिकेटेड स्टाइलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
अनन्याने ब्लॅक क्रोशे को-ऑर्ड सेट परिधान केला होता. व्ही-नेकलाइन असलेला क्रोशे टॉप आणि मिनी स्कर्ट, त्यावर सुंदर से-थ्रू आयलेट डिटेलिंग होती. तिचा हा लुक फॅशन प्रेमींना भुरळ घालणारा ठरला.
तिच्या पोशाखावर पांढऱ्या रंगातील स्कॅलप्ड ट्रिम डिटेल्स वापरल्या होत्या, त्यामुळे तिच्या ड्रेसला एक क्लासिक आणि फ्रेश कॉन्ट्रास्ट मिळाला.
अनन्याने मिनिमल ज्वेलरी निवडली केवळ गोल्ड इयररिंग्ज, एक चेन बॅग आणि ब्लॅक स्लिंग-बॅक पंप्स.
तिने सॉफ्ट ग्लॅम मेकअप केला होता. न्यूड टोन, ग्लॉसी लिप्स आणि हलके वेव्ही केसांनी तिच्या लुकला ग्लॅमरस टच दिला.
या शोदरम्यान अनन्याने BLACKPINK ची Jennie, अभिनेता Pedro Pascal आणि इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींशी तिने संवाद साधला. तिच्या उपस्थितीने भारतीय फॅशन जगतात नवा अभिमान निर्माण केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.