Varun Chakaravarthy KL Rahul x
Sports

IPL 2025 : 'हे माझं मैदान...'; केएल राहुलनंतर वरुण चक्रवर्तीचा व्हिडिओ व्हायरल, पाहा पोस्ट

Varun Chakaravarthy Video : चेपॉक स्टेडियमवर काल सीएसके विरुद्ध केकेआर हा सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाताचा विजय झाला. विजयानंतर केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने खास सेलिब्रेशन केले.

Yash Shirke

IPL 2025 News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना दिल्लीने जिंकला. विशेष म्हणजे घरच्या स्टेडियममध्ये दिल्लीने बंगळुरूला धूळ चारली. या सामन्यात लोकल बॉय केएल राहुलने दिल्लीकडून खेळताना सर्वाधिक ९३ धावा केल्या. शेवटपर्यंत टिकून खेळत राहुलने दिल्लीचा विजय निश्चित केला. सामना जिंकल्यानंतर त्याने कांतारा स्टाईल सेलिब्रेशन केले.

बंगळुरू विरुद्ध दिल्ली सामन्यात शेवटचा विजयाचा शॉट मारल्यानंतर केएल राहुलने खास सेलिब्रेशन केले. त्याने बॅटने जमिनीवर गोलाकार आकृती काढली आणि त्याच्या मध्यभागी बॅट आपटून सेलिब्रेशन केले. 'ही जागा, हे मैदान, हे स्टेडियम' माझे आहे असे राहुलने सेलिब्रेशनच्या माध्यमातून सांगितले. राहुलचा कांतारा सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केएल राहुलप्रमाणे कोलकाचा नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने देखील कांतारा स्टाईल सेलिब्रेशन केले. काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यामध्ये केकेआरचा विजय झाला. चेपॉकच्या स्टेडियमवर चेन्नईला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. सामना संपल्यानंतर वरुण चक्रवर्तीने केएल राहुलसारखे सेलिब्रेशन केले.

वरुण चक्रवर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात वरुण हे स्टेडियम, हे मैदान माझे आहे, असे हातवारे करुन सांगत असल्याचे पाहायला मिळते. वरुण चक्रवर्ती तामिळनाडू संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. वरुणसाठी चेपॉक स्टेडियम घर आहे. त्याने अनेक सामने या स्टेडियमवर खेळले आहेत. ज्याप्रमाणे केएल राहुलसाठी चिन्नास्वामी स्टेडियम खास आहे, त्याप्रमाणे वरुणच्या आयुष्यात चेपॉक स्टेडियमचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT