LSG VS GT Mitchell Marsh : लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं...! मिचेल मार्शची लेक आजारी, खेळाडूनं घेतला मोठा निर्णय

Mitchell Marsh : लखनऊचा इन-फॉर्म फलंदाज मिचेल मार्शची लेक आजारी पडली आहे. त्यामुळे मिचेल मार्शने आजचा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
LSG VS GT Mitchell Marsh
LSG VS GT Mitchell Marshx
Published On

Mitchell Marsh LSG VS GT : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यामध्ये लखनऊच्या प्लेईंग ११ मध्ये एक बदल करण्यात आला आहे. लखनऊकडून तुफान फटकेबाजी करणाऱ्या मिचेल मार्शच्या जागी हिम्मत सिंगला संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला गुजरातच्या संघामध्येही बदल झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी गुजरात टायन्सचे खेळाडू मैदानामध्ये उतरले आहेत. डबल हेडरमधील पहिल्या रोमांचक सामन्याला सुरुवात झाली आहे.

LSG VS GT Mitchell Marsh
CSK मध्ये वादाची ठिणगी? धोनी कर्णधार होताच ऋतुराजचं मोठं पाऊल, सोशल मीडियावरील कृतीतून चित्रच समोर आलं

टॉस झाल्यानंतर रिषभ पंतने प्लेईंग ११ मधील बदलाची माहिती दिली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला मिचेल मार्श आजचा सामना खेळणार नसल्याची त्याने माहिती दिली. मिचेल मार्शची लेक आजारी आहे. या कारणामुळे त्याने आजचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इन फॉर्मच्या जागी हिम्मत सिंगला संधी देण्यात आली आहे. मिचेल मार्शने आयपीएल २०२५ मधील ५ सामन्यातील ४ सामन्यांमध्ये अर्धशतकीय खेळी केली आहे. त्याने २६५ धावा केल्या आहेत.

LSG VS GT Mitchell Marsh
MS Dhoni लवकर बाद झाला नसता, तरी काय फरक नसता पडला; वीरेंद्र सेहवागचा Video Viral

गुजरात टायटन्सची प्लेइंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग ११ -

एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, रवी बिश्नोई

LSG VS GT Mitchell Marsh
Virat Kohli : ३०० कोटींची ऑफर विराट कोहलीने नाकारली, बऱ्याच वर्षांपासूनचे असलेले संबंध तोडले; जाणून घ्या नेमकं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com