Vaibhav Suryavanshi saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi : आऊट झाल्यानंतर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर; डोळे पुसत पोहोचला पव्हेलियनमध्ये, Video व्हायरल

RR vs LSG: शनिवारी रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतर राजस्थानचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

शनिवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या अटीतटीच्या सामन्यात अखेरीस लखनऊचा विजय झाला. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वी एकच चर्चा होती ती म्हणजे वैभव सूर्यवंशीची. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८१ रन्सचं आव्हान मिळालं होतं.

अनफीट असल्या कारणाने राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन टीमबाहेर होता. त्याच्या जागी रियान परागने टीमची धुरा सांभाळली होती. लखनऊने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या टीमकडून १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. या सामन्यात वैभने २० बॉल्समध्ये ३४ रन्सची खेळी केली. मात्र त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. यावेळी आऊट झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये परतत असताना वैभवला अश्रू अनावर झाले होते.

पहिल्याच बॉलवर लगावली सिक्स

लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध सामन्यात वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये डेब्यू केला. यावेळी फलंदाजीला उतरल्यानंतर त्याने पहिल्याच बॉलवर सिक्स लगावली. वैभव आयपीएलच्या इतिहासातील १० वा असा खेळाडू आहे ज्याने डेब्यू सामन्यात सिक्स लगावली आहे.

लखनऊ विरूद्धच्या सामन्यात वैभवने ३४ रॅन्सच्या खेळीमध्ये एकूण २० चेंडूंचा सामना केला. ज्यामघ्ये २ फोर आणि ३ सिक्सेसचा समावेश आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १७० होते. यंदाच्या ऑक्शनमध्ये वैभवला १० लाख रूपये मोजत राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं होतं.

ओपनिंगला उतरला होता वैभव

संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत वैभव सूर्यवंशी यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंगला उतला होता. यावेळी दोन्ही खेळाडूंनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८५ रन्सची खेळी केली. ९ व्या ओव्हरमध्ये एडम मारक्रमने वैभवची विकेट घेतली. यावेळी मैदानाबाहेर जाताना वैभव भावूक झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT