Ishan Kishan: पराभवानं निराश झालेल्या इशान किशनची नीता अंबानींनी लहान बाळाप्रमाणं काढली समजूत; कॅमेरानं टीपला भावनिक क्षण

IPL 2025: यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा खेळ काही फारसा चांगला झालेला नाही. गुरुवारच्या सामन्यात देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर नीता अंबानी आणि इशान किशन यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
IPL 2025
IPL 2025saam tv
Published On

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची गाडी रूळावर येताना दिसतेय. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजय मिळवला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादने १६२ रन्स केले होते. या आव्हानाचा सामना करताना १९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये तिलकने फोर मारून मुंबईला विजय मिळवून दिला.

दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर फलंदाज इशान किशन काहीसा नाराज दिसून आला. पहिल्या सामन्यानंतर त्याला पुढे कोणत्याही सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. मुंबई विरूद्धच्या सामन्यात देखील इशान किशनचा खेळ खराब झाला. सामन्यानंतर तो काहीसा चिंतेत होता मात्र अशातच नीता अंबानी त्याला सपोर्ट करताना दिसल्या.

IPL 2025
MI vs SRH: 6 बॉल, 2 विकेट्स आणि 1 रन...; हरता हरता जिंकली मुंबई इंडियन्स, इतका ड्रामा कधी पाहिलाच नसेल

नीता अंबानींना भेटला इशान किशन?

सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानींची इशान किशनने भेट घेतली. आयपीएल २०२५ च्या ऑक्शनपूर्वी तब्बल ७ वर्ष इशान किशन मुंबईच्या टीमसोबत होता. मात्र यंदाच्या ऑक्शनमध्ये त्याला हैदराबादने खरेदी केलं. यानंतर पहिल्यांदाच इशान मुंबईविरूद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र या सामन्यात त्याची बॅट शांत होती. असं असूनही सामन्यानंतर एका भावनिक क्षण पाहायला मिळाला.

IPL 2025
Sanju Samson: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का; कर्णधार संजू सॅमसनला पुन्हा दुखापत, टूर्नामेंटमधून बाहेर होणार?

नीता अंबानींना केला नमस्कार

सामन्याचा निकाल लागल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करत आपापल्या टीमकडे जात होते. त्यावेळी इशान किशन नीता अंबानींकडे गेला आणि हसून त्यांना नमस्कार केला. नीता अंबानींनी देखील त्याला प्रेमाने प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेऊन चर्चा केली. यावेळी काही वेळ बोलून तो आपल्या टीमसोबत निघून गेला.

IPL 2025
Rohit Sharma: 'त्या' मुद्द्यावरून मी गंभीर-आगरकरशी भांडलो...! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून रोहित शर्माचा मोठा खुलासा

मुंबईचा तिसरा विजय

गुरुवारी वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला आहे. आयपीएल २०२५ मधला हा मुंबईचा तिसरा विजय होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये एकूण १६२ रन्स केले. हे आव्हान पेलवत मुंबईने १६६ रन्स करून सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com