
गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अखेरीस मुंबई इंडियन्सने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियनसला विजयासाठी १६३ रन्सचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या अगदी नाकीनऊ आले. या सामन्यात एका ओव्हरमध्ये कसा हायल्होल्टेज ड्रामा रंगला ते पाहूयात.
लक्ष्याचा पाठलाग करताना १७ व्या ओव्हरमध्ये मुंबईचा स्कोर १६१ असा होता. यानंतर १८ व्या ओव्हरला ईशान मलिंगा गोलंदाजीसाठी आला. यावेळी तिलक वर्माने एक रन घेतला. यानंतर दोन्ही टीमचा स्कोर बरोबरीत आला. दुसरीकडे कर्णधार हार्दिक पंड्या स्टाईकवर आला. यावेळी हार्दिकने सिक्स मारून सामना संपवण्याचा विचार करत शॉट मारला मात्र त्याच्याकडून चूक झाली. यावेळी तो कॅच आऊट झाला.
हार्दिक पंड्या आऊट झाल्यानंतर नमन धीरने फलंदाजीसाठी मैदानात आला. यावेळी सलग दोन बॉल्सवर त्याने रन घेतला नाही. यानंतर तिसरा बॉल पॅडल स्विल करण्याच्या नादात तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. मैदानातील अंपायरने आऊट दिल्यानंतर नमनने रिव्ह्यू मानगितला. मात्र थर्ड अंपायरचा निर्णय देखील त्याच्या विरोधात गेला.
नमन धीर आऊट झाल्यानंतर मिचेल सँटनर क्रिझवर आला. यावेळी सँटनरला देखील पहिल्या बॉलवर एक रन काढता आला नाही. यानंतर ओव्हर संपली. १९ वी ओव्हर टाकण्यासाठी जीशान अंसाली आला. अखेरीस यावेळी तिलक वर्माने वेळ न घालवता फोर लगावली आणि टीमला विजय मिळवून दिला. असा पद्धतीने मुंबईने ४ विकेट्सने सामना जिंकला.
मुख्य म्हणजे मुंबई इंडियन्सला जे काम एका बॉलमध्ये करायचं होतं ते काम करण्यासाठी त्यांना ६ बॉल्स लागले. याचा परिणाम रन रेटवर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा टॉप ४ गाठण्यासाठी नेट रनरेटची गरज असल्यास मुंबई इंडियन्स अडचणीत येऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.