भारत-पाकिस्तान फायनलला भिडणार
श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सुपर-4 सामना
बुमराह, वरुणला विश्रांती देण्याची शक्यता
एशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आधीच फाइनल गाठली होती. मात्र त्यानंतर आता पाकिस्तानने गुरुवारी बांग्लादेशाचा पराभव करत फायनलचं तिकीटं मिळवलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताला फायनलमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा सामना करावा लागाणार आहे.
फाइनलच्या आधी टीमला सुपर-4 टप्प्यात श्रीलंकेविरुद्ध एक शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. टीम इंडिया मॅनेजमेंट काही प्रमुख खेळाडूंना फाइनलपूर्वी विश्रांती देऊ शकते. शिवाय यावेळी त्यांची जागा बेंचवर बसलेले खेळाडू घेऊ शकतात.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतात तीन बदल निश्चित होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिलं नाव जसप्रित बुमराहचं आहे. या सामन्यात बुमराहला ब्रेक देऊन त्याऐवजी अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेवनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय वरुण चक्रवर्तीऐवजी टीममध्ये हर्षित राणा खेळू शकतो.
इतकंच नाही तर टीम मॅनेजमेंट हार्दिक पंड्या किंवा तिलक वर्मा या दोघांपैकी कोणाला बाहेर ठेवून रिंकू सिंह किंवा जितेश शर्माला संघात स्थान देण्याचं म्हटलं जातंय.
एशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया अजेय स्थितीत आहे. या स्पर्धेत अद्याप कोणताही सामना हरलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम त्याचा हा अनमोल रेकॉर्ड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे या सामन्यात कोणतेही मोठे फेरबदल करणं शक्य वाटत नाही.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, रिंकू सिंह / जितेश शर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या / तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
एशिया कप २०२५ च्या फायनलमध्ये कोण खेळत आहेत?
भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोणते बदल होऊ शकतात?
बुमराह आणि वरुणच्या जागी अर्शदीप व हर्षित.
रिंकू सिंहला संधी का मिळू शकते?
हार्दिक किंवा तिलकपैकी एकाला बाहेर काढले जाईल.
भारताची स्पर्धेतील कामगिरी कशी आहे?
भारत अजूनपर्यंत एकही सामना हरलेला नाही.
फायनलपूर्वी टीम मॅनेजमेंट का बदल करत आहे?
महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.