IND vs PAK: एशिया कपमधील वाद काही संपेना; BCCI ने पाकच्या २ खेळाडूंची ICC कडे केली तक्रार

Asia Cup controversy: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. या सामन्यांमध्ये मैदानावर अनेकदा खेळाडूंच्या वागणुकीवरून वाद (Controversy) निर्माण होतात.
IND vs PAK
IND vs PAKsaam tv
Published On
  • भारत-पाकिस्तान सामन्यात वाद

  • BCCI ने ICC ला केली तक्रार

  • फरहान-रऊफविरुद्ध कारवाई

एशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात निर्माण झालेल्या वादावर अजूनही विराम लागलेला नाही. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी अशी कारवाई केली, ज्यावर भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) मोठी एक्शन घेतली आहे. बोर्डाने या प्रकरणात पाकिस्तानच्या या दोन खेळाडूंविरुद्ध मोठा निर्णय घेतला असून, त्यामुळे त्यांची अडचण वाढू शकते.

त्याचबरोबर, 14 सप्टेंबरला सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत टॉसदरम्यान हात नाही मिळवण्याच्या प्रकरणावर देखील सामन्याचे रेफरी टीम इंडियाच्या कर्णधाराकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

एशिया कप 2025 च्या सुपर-4 मध्ये 21 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला होता. हा सामना टीम इंडियाने 6 विकेट्सने जिंकला. दरम्यान पाकिस्तानचा ओपनर फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर गन सेलिब्रेशन केलं. त्यानंतर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज हारिस रऊफने फिल्डिंग करताना विमान खाली गेला असे हावभाव केले.

अशा प्रकारच्या कृतींमुळे टीम इंडिया नाराज झाली आहे. BCCI ने 24 सप्टेंबरला ICC कडे याची तक्रार नोंदवली. रऊफ आणि साहिबजादाचे व्हिडिओ ईमेलमध्ये संलग्न करून पाठवण्यात आले आहेत. ICC ने ही तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे. जर रऊफ आणि फरहान या आरोपांचा नकार देतील, तर त्यांना ICC एलीट पॅनल रेफरी रिची रिचर्डसन समोर सुनावणीला सामोरं जावं लागेल.

IND vs PAK
Rohit Sharma : आशिया कपआधी रोहित शर्मासाठी गुड न्यूज; फॅन्स छातीठोकपणे म्हणणार, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!

साहिबजादा फरहानची प्रतिक्रिया

साहिबजादा फरहानने आपल्या गन सेलिब्रेशनविषयी सांगितले की, "तो फक्त आनंदाचा क्षण होता. मी अर्धशतक ठोकल्यानंतर फारसं सेलिब्रेशन करत नाही, पण त्या क्षणी मनात आलं की थोडा आनंद साजरा करावा. मी काय करतोय याची मला कल्पना नव्हती की, लोक याला कसं घेतील."

तथापि BCCI अधिकारी म्हणाले की, ही कृती त्याने जाणूनबुजून केली असून त्याला याचा पश्चाताप नाही. टीम इंडियाच्या तर्फे संपूर्ण डोजियर तयार करून मैच रेफरी अँडी पायक्राफ्टकडे पाठवण्यात आलं आहे.

IND vs PAK
Asia Cup 2025: पाकिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; श्रीलंका-बांग्लादेशाचं नुकसान, कोण गाठणार फायनल?

सूर्यकुमार यादवकडून स्पष्टीकरण मागितलं

14 सप्टेंबरला भारताच्या कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसदरम्यान पाकिस्तानच्या कर्णधार सलमान आगा सोबत हँडशेक केला नव्हता. त्यानंतर सूर्याकडून काही विधानंही झाली होती, ज्यावरून PCB ने ICC कडे तक्रार केली होती. ICC ने ही तक्रार रेफरी रिची रिचर्डसनकडे पाठवली आहे.

IND vs PAK
Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

रिचर्डसनने सूर्यकुमार यादवला ईमेलद्वारे कळवले की, "माझ्या हाती आलेल्या दोन रिपोर्ट्स पाहून मी असा निष्कर्ष काढला आहे की, भारतीय कर्णधाराच्या विधानामुळे खेळाची प्रतिमा धोक्यात आली आहे. जर तो आरोप नाकारत असतील, तर सुनावणी होईल. या सुनावणीत माझ्यासह भारतीय कर्णधार आणि PCB चे प्रतिनिधी उपस्थित राहतील."

हा प्रकार दर्शवतो की एशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यातील वाद अजूनही ताजे आहेत आणि दोन्ही संघांसाठी हे प्रकरण गंभीर बनले आहे.

IND vs PAK
Abhishek Sharma : फायर हूँ मैं....पाकिस्तानला नडणारा अभिषेक शर्मा टी २० मध्ये @1
Q

कोणत्या घटनेमुळे वाद झाला?

A

फरहानचे सेलिब्रेशन आणि रऊफचे हावभाव.

Q

BCCI ने काय कारवाई केली?

A

ICC कडे औपचारिक तक्रार नोंदवली.

Q

सूर्यकुमारवर का आरोप आहेत?

A

टॉसवेळी हातमिळवणी न केल्याचे आरोप.

Q

ICC ने प्रकरण कोणाकडे सोपवले?

A

रिची रिचर्डसन यांच्याकडे सुनावणीसाठी.

Q

खेळाडूंना काय शिक्षा होऊ शकते?

A

सुनावणीनंतर बंदी किंवा दंड होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com