Pak vs Ban : पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशनं उतरवली तगडी टीम, ३ बदल केले; जिंकणार तो थेट भारताविरुद्ध फायनल खेळणार

Asia Cup 2025 Semi Final Pak vs Ban : आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 'सेमिफायनल' होत आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ फायनलमध्ये भारतासोबत भिडणार आहे.
Ban vs Pak in Asia cup 2025
Ban vs Pak in Asia cup 2025saam tv
Published On

आशिया कप स्पर्धेचा 'सेमिफायनल' सामना होत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात ही काट्याची टक्कर होत आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जाणार आहे. तर पराभूत होणारा संघ गाशा गुंडाळून मायदेशी रिकाम्या हाती परतणार आहे. दरम्यान, पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली असून, पाकिस्तानला सुरुवातीलाच दोन झटके मिळाले आहेत.

दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा महामुकाबला होत आहे. बांगलादेशला काल, बुधवारी भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळं आज पाकिस्तानविरुद्ध जिंकण्याच्या इराद्यानंच बांगलादेशी क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत. तर पाकिस्तानचा संघही विजयासाठी उत्सुक असेल. कारण भारताकडून दोन सामन्यांत मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागल्याने प्रचंड टीका सहन करावी लागली आहे. त्यामुळं बांगलादेशविरुद्ध जिंकून पराभवाच्या जखमांवर तात्पुरती का होईना मलमपट्टी करण्याचा मनसुबा असेल.

बांगलादेशनं टॉस जिंकला

बांगलादेशनं पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकला असून, प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आहे. आम्ही प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. ड्राय विकेट आहे. प्रथम गोलंदाजी करताना आम्ही चांगली कामगिरी करतो. आमचा प्लानही तसाच आहे. बॉलिंग युनिट म्हणून चांगली कामगिरी करत आहोत. या सामन्यात चांगली फलंदाजी होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही या सामन्यासाठी तीन बदल केले आहेत, अशी माहिती बांगलादेशचा कर्णधार जकेर अली यानं दिली.

आम्हाला प्रथम फलंदाजीच हवी होती. त्यामुळे काही हरकत नाही. पिच उत्तम आहे. स्कोअरबोर्डचा प्रेशर महत्वाचा आहे. दीडशे धावा केल्यानंतर आम्ही त्या डिफेंड करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आम्हाला नेहमीच चांगला खेळ करायचा असतो आणि आखलेल्या प्लानची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असतो. कोणत्याही स्पर्धेची फायनल खेळणं अत्यंत महत्वाचे असते. आमचं या सामन्यावर आमचं लक्ष केंद्रीत आहे. तो जिंकायचा आहे. आम्ही मागील प्लेइंग इलेव्हनसह खेळत आहोत, अशी माहिती पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यानं दिली.

Ban vs Pak in Asia cup 2025
India vs Bangladesh: आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश; अभिषेक शर्मा अन् कुलदीप समोर बांगलादेशनं नांगी टाकली

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन

सैफ हसन, परवेझ हुसैन इमॉन, तौहिद हृदोय, शमीम हुसैन, जाकेर अली, नुरुल हसन, मेहेदी हसन, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजूर रेहमान

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन

साहिबजादा फरहान, फखर झमान, सैम अयुब, सलमान आगा, हुसैन तलत, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाझ, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ, अबरार अहमद

Ban vs Pak in Asia cup 2025
IND vs PAK: एशिया कपमधील वाद काही संपेना; BCCI ने पाकच्या २ खेळाडूंची ICC कडे केली तक्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com