
भारताने बांगलादेशला ४१ धावांनी पराभूत केलं.
भारत १२व्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला.
कुलदीप यादवने ३ बळी घेत शानदार गोलंदाजी केली.
आशिया कपच्या सुपर ४ फेरीत पाकिस्तानानंतर भारताने बांगलादेशलाही हरवलं. या विजयासह टीम इंडिया आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. टीम इंडियाच्या विजयाचे हिरो अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव होते. अभिषेक शर्माने फलंदाजीत आणि गोलंदाजीत कुलदीपनं चमकदार कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने ४१ धावांनी जिंकला.
अभिषेक शर्माने फक्त ३७ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. तर कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतलं. भारतीय संघ आता २६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सुपर ४ राउंड सामना खेळणार आहे.
तसे पाहिले तर टीम इंडियाची फलंदाजी मजबूत मानली जाते, परंतु आजचा सामना गोलंदाजांनीच जिंकवून दिला. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकात ब्रेकथ्रू दिला, परंतु वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये विजयाची नोंदवला. गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने दोन आणि कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. दोन्ही गोलंदाजांनी आठ षटकांत ४७ धावा देत बांगलादेशचे पाच गडी तंबूत पाठवले.
अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत अनेकांना चकीत केलं. अभिषेकनं फलंदाजाने सलग दुसरे अर्धशतक झळकावत टीम इंडियाला २० षटकांत १६८ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. कठीण खेळपट्टीवर जेथे इतर फलंदाजांना चौकार मारण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, तिथे अभिषेक शर्माने पाच षटकार आणि सहा चौकार लगावत २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.