
भारताने बांगलादेशविरुद्ध आशिया कप २०२५ सामन्यात धडाकेबाज सुरुवात
अभिषेक शर्माने केवळ २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय
शुभमन गिलने २९ धावा तर शिवम दुबे फक्त २ धावा करून बाद
१२ व्या षटकात अभिषेक आणि सूर्यकुमार यादव झाले बाद
आशिया कप स्पर्धेत आज बुधवारी भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यान सुरु आहे. बांगलादेशचा कर्णधार जाकिर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवर फलंदाजांनी धमाकेदार सुरुवात केली आहे. भारताच्या शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने बांगलादेशच्या गोलंदाजांना फोडून काढलं आहे. अभिषेक शर्माने १२ च्या सरासरीने अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना पहिल्या काही षटकात चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकात गिल आणि अभिषेकने ३ धावा कुटल्या. त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना फोडण्यास सुरुवात केली. अभिषेकने सुरुवातीला संयमी खेळ दाखवला. शुभमनने चौथ्या षटकात चौकार-षटकार लगावण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिषेकने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली.
भारताचे ५ षटकात ५५ धावा झाल्या. पुढे सातव्या षटकात भारताला पहिला झटका बसला. शुभमन गिल २९ धावा करून बाद झाला. दुसरीकडे अभिषेकने २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. ९ व्या षटकात भारताला दुसरा झटका बसला. शिवम दुबे अवघ्या २ धावांवर बाद झाला. भारताला पुढे १२ व्या षटकात तिसरा झटका बसला. अभिषेक शर्मा ३७ चेंडूत ७५ धावा करून बाद झाला. तर याच षटकात कर्णधार सूर्यकुमार यादवचा देखील विकेट गेला. सूर्यकुमार यादव अवघ्या ५ धावांवर बाद झाला.
भारत - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन(यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, तिलक वर्मा,
बांगलादेश - सैफ हसन, तन्झिम हसन साकिब, जाकेर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिद हसन तमीम, मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, शमीम हुसैन, तन्झिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.