India vs Pakistan Hockey Final: चक दे इंडिया! Asia Cup स्पर्धेत टीम इंडियाची सुवर्ण कामगिरी; पाकिस्तानला धूळ चारत रचला इतिहास

Junior Asia Cup Hockey Tournament: स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते.
indian hockey team
indian hockey team twitter
Published On

Ind vs Pak Hockey: ओमानच्या सालालाहमध्ये ज्युनियर एशिया कप हॉकी स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. गुरुवारी (१ जून) पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत २-१ विजय मिळवला.

indian hockey team
Team India Playing 11 : ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लॅन! या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात; रोहितचा जिगरी संघाबाहेर

या विजयासह भारतीय संघाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघाने एशिया कप हॉकी स्पर्धेत सर्वाधिक ४ जेतेपदं पटकावली आहेत. याबाबतीत भारतीय संघाने पाकिस्तान संघाला मागे सोडलं आहे. पाकिस्तानच्या नावे ३ जेतेपदं पटकावण्याची नोंद आहे.

तब्बल ८ वर्षांनंतर स्पर्धेचे आयोजन...

तब्बल ८ वर्षांनंतर एशिया कप हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २०१५ मध्ये या स्पर्धेचे आयोजन मलेशियामध्ये केले गेले होते. तसेच भारतीय संघाच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, एकच नंबर कामगिरी केली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात ९-१' ने धुव्वा उडवला होता. तर पाकिस्तानने मलेशियाला ६-२ ने पराभूत केलं होतं. (Latest sports updates)

indian hockey team
CSK Trophy : देव पावला! IPL जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी -VIDEO

भारतीय संघाचं अर्धशतक..

उत्तम सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने या स्पर्धेत जोरदार कामगिरी केली. साखळी फेरीत भारतीय संघाने ४ सामने खेळले. यापैकी ३ सामन्यात विजय मिळवता आला. तर १ सामना ड्रॉ झाला.

भारतीय संघ ज्या ग्रुपमध्ये होता, त्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, थायलंड, जपान आणि चिनी ताईपाई संघांचा समावेश होता. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकूण ३९ गोल केले. तर एकूण स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने अर्धशतक पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com