team india saam tv news
Sports

World Cup 2023 Points Table: डायरीत नोट करून ठेवा! हेच '४' संघ करणार सेमीफायनलमध्ये प्रवेश

World Cup 2023 Semi Final Race: हे ४ संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात.

Ankush Dhavre

World Cup 2023 Points Table:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत २६ सामने झाले आहेत. स्पर्धेतील २५ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या अटीतटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने १ गडी राखून विजय मिळवला.

यासह दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत भारतीय संघाला मागे सोडत अव्वल स्थान गाठलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात जात असताना सेमी फायनलचं चित्र स्पष्ट होत आहे.

दरम्यान आम्ही तुम्हाला असे ४ संघ सांगणार आहोत जे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतात.

पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. या सामन्यात पाकिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवताच दक्षिण आफ्रिकेचा संघ १० गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत ६ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर केवळ एका सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

यजमान भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी सरकला आहे. भारतीय संघ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

भारतीय संघाचे देखील १० गुण आहेत. मात्र रन रेटमुळे भारतीय संघ दुसऱ्या स्थानी सरकला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लंडविरूद्ध होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ पुन्हा एकदा विराजमान होऊ शकतो. भारतीय संघ केवळ सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी नव्हे तर जेतेपद जिंकण्यासाठी देखील प्रबळ दावेदार मानलं जात आहे. (Latest sports updates)

सध्या न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत खेळलेल्या ५ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ८ गुणांसह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

न्यूझीलंडला देखील सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.न्यूझीलंडचा संघ पुढील सर्व सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर न्यूझीलंडला मागे सोडण्यासाठी ऑस्ट्रेलियानेही कंबर कसली आहे.

सुरुवातीचे दोन्ही सामने गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पुढील ३ सामन्यांमध्ये दमदार कमबॅक केलं आहे. ५ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानी आहे. अनेक क्रिकेट दिग्गजांच्या मते हेच ४ संघ वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT