शुक्रवारी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हाय व्होल्टेज सामन्याचा थरार रंगला. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. हा पाकिस्तानचा या स्पर्धेतील चौथा पराभव ठरला आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयाच्या अगदी जवळ होता. शेवटी तबरेज शम्सीने चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम निराश असल्याचं दिसून आलं. दरम्यान त्याने पराभवाचं कारण सांगत मोठं वक्तव्य केलं आहे.
या सामन्यातील ४६ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑलआउट होऊन पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकू शकला असता. मात्र फलंदाजी करत असलेल्या तबरेज शम्सीला अंपायरने LBW आउट दिलं नाही.
अंपायरने नॉटआउट दिल्यानंतर बाबर आझमने DRS ची मागणी केली. DRS मध्ये स्पष्ट दिसून येत होतं की, चेंडू लेग स्टंपला जाऊन धडकतोय. मात्र अंपायर्स कॉलमुळे शम्सी थोडक्यात बचावला. जर मैदानावर असलेल्या अंपायरने त्याला बाद घोषित केलं असतं तर तिसऱ्या अंपायरलाही आउटचा निर्णय देता आला असता. यासह पाकिस्तान हा सामना जिंकू शकला असता. (Latest sports updates)
अंपायरच्या निर्णयामुळे पाकिस्तान पराभूत झाला?
हा सामना झाल्यानंतर बाबर आझमला DRS बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने उत्तर देत म्हटले की,' हा पूर्णतः अंपायरचा निर्णय आहे. हा खेळाचा एक भाग आहे. जर त्याला आउट दिलं गेलं असतं तर हा निर्णय आमच्या बाजूने लागला असता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्ही खूप जवळ पोहोचलो होतो. पण आम्हाला गोड शेवट करता आला नाही. संपूर्ण संघासाठी हे खूप निराशाजनक आहे. आम्ही खूप चांगल्याप्रकारे त्यांना आव्हान दिलं. फलंदाजीत आम्ही १०-१५ धावा मागे पडलो. तरीसुद्धा वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी चांगला संघर्ष केला. दुर्दैवाने आम्ही हा सामना जिंकू शकलो नाही.
सेमीफायनलमध्ये जाण्याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' हा सामना जिंकून आम्हाला सेमीफायनलच्या शर्यतीत बनून राहण्याची संधी होती. मात्र आम्ही हे करू शकलो नाही. येणाऱ्या ३ सामन्यांमध्ये आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू. त्यानंतर बघू आम्ही कितव्या क्रमांकावर आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.